कोरोना मुळे बाजारपेठा बंद,वांगी बांधावर –डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मौजे वैजाळा येथिल प्रगतिशील शेतकरी रामदास येडे यांनी कोरोना आजारामुळे शासनाने बाजारपेठा बंद ठेवण्याचे दुष्परिणाम दिसु लागले असुन वांगी तोडून शेतातील बांधावर फेकली जात आहेत.

क्रांती रामदास येडे : २ एकर ११गुंठे शेतीमध्ये वांग्याची लागवड केली, नांगरट , रोटावेटर , बेड काढणे , भेसळ डोस, रासायनिक खते आदिचा खर्च ८० हजार रुपये आला.कमीतकमी ३ लाख रू उत्पन्न अपेक्षित होते, परंतु कोरोना रोगाने बाजारपेठा बंद पडल्यामुळे वांगी बांधावर टाकायची वेळ आली.

रामदास येडे : कोरोना महामारी मुळे बाजारपेठा बंद आहेत.४० क्यारेट पाठवली तर ५-६ विकली जातात,बाकीचे परत पाठवतात,मग वांगी तोडण्यासाठी मजुरांचा खर्च परवडत नाही.कधीकधी गाडीभाडे पदरुन द्यावे लागतात. कोरोना रोगाच्या संपुष्टानंतर जिल्हाप्रशासनाने आर्थिक मदत देण्यात यावी.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत– डॉ.गणेश ढवळे

शेती व्यावसायाविषयी औदासिन्य वाढले आहे, शेतीचा आकार कमी होणं ,शेतीमालाचा भरवसा नसणे त्यामुळे शेतिमध्ये गुंतवणुक आपली.ग्रामिण भागात शेती आधारित व बिगर शेती व्यवसाय निर्माण होऊ शकले नाहीत.याची जाणिव कोरोनाग्रस्त काळामध्ये तिव्रतेने जाणवत आहे.ही परिस्थीती बदलायची असेल तर सर्व प्रथम खालील शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे लागतील.
१ कमाल शेतजमीन धारणा कायदा
२) आवश्यक वस्तू कायदा
३) जमिन अधिग्रहण कायदा हे देशाच्या विकासाला अडथळा ठरणारे कायदे रद्द करा अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.