जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून दुकान उघडलेल्याने पाटोदा पोलिस स्टेशनची दुकान मालकावर कारवाई

पाटोदा:गणेश शेवाळे― कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन केले असून फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानदारांनेच दुकाने उघडण्याची परवानगी शासनाने दिली असून बीड जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा म्हणून बीड जिल्ह्यातही प्रशासन चांगल्या प्रकारे काम करत आहे यातच पाटोदा शहरात जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश असतानाही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बस स्टँड समोरील चप्पल शूज सेंटरचे दुकान चालू केले ही बाब एपीआय कोळेकर यांच्या लक्षात आल्याने जीवनावश्यक वस्तू आस्थापना नसताना ही संचार बंदी चे कालावधीत दुकान चालू ठेवले म्हणून भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार आकाश चप्पल शूज सेंटरचे मालक हरिकृष्ण श्रीहरी गीते यांच्यावर पाटोदा पोलिस स्टेशनचे एपीआय कोळेकर यांनी दुकान मालकास पकडून गुन्हा दाखल केल्याने अशा प्रकारची कारवाई पाटोदा शहरात पहिल्यांदाच झाल्याने व्यापारी वर्गात धास्ती बसली असून लॉकडाऊन च्या काळात जीवनावश्यक वस्तू शिवाय दुसरे दुकान चालू दिसल्यास आशे गुन्हे पुन्हा दाखल होतील यामुळे व्यापारी बांधवाने जिल्हावर आलेले संकट टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान एपीआय कोळेकर यांनी केले आहे तर ही फिर्यादी म्हणून पोलीस नाईक मदन क्षीरसागर झाले आहेत तर चप्पल शूज दुकानदारावर कारवाई करताना एपीआय कोळेकर बरोबर पो ना डोके,पो ना क्षीरसागर व इत्यादी बरोबर होते.