औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

कोरोना लाकडाऊन संचारबंदीवर सोयगावात ड्रोन कॅमेरा ; पोलिसांचा तिसरा डोळा फिरकला शहरावर

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाच्या संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होवू नये यासाठी बुधवारी दुपारी शहरावर पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची दृष्टी फिरकली असतांना मात्र या तिसऱ्या डोळ्याच्या ड्रोन कॅमेऱ्यात उल्लंघन करतांना कोणीही कैद झाले नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी दिली.
शहरभर ड्रोन कॅमेऱ्यात कैद करून पोलिसांनी संचार बंदी व लॉकडाऊनच्या काळात शहरावर नजर फिरवली,परंतु या पोलिसांच्या ड्रोन कॅमेरा प्रयोगात कोणतेही उल्लंघन आढळून आले नसून पोलिसांनी या प्रयोगादरम्यान नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहनही केले होते,त्यामुळे शहरात कमालीचा सन्नाटा पसरला होता.तासभर शहरावर पोलिसांची तिसरी वक्रदृष्टी फिरविण्यात आली होती,यावेळी शहराच्या गल्ली बोळात पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी निरीक्षण केले.उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम राबविण्यात आली होती.

गुरुवारी बनोटीला ड्रोन कॅमेरा प्रयोग-

गुरुवारी बनोटी परिसरावर पोलिसांचा तिसरा डोळा फिरविण्यात येणार असून नागरिकांनी संचार बंदी आणि लॉकडाऊनचे उल्लंघन करू नये असेही आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी केले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    कोरोना संसर्गाच्या संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात सोयगाव शहरासह तालुक्यात कुठेही जास्त प्रमाणात उल्लंघन झालेले नाही.त्यामुळे सोयगावचे नागरिक कायदा व सुव्यवस्था पाळण्यात तरबेज असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.परंतु सोयगावला हा प्रयोग राबविण्याचा उद्देश केवळ खात्री करण्यासाठी होता.
    ―"सुदर्शन मुंडे"
    उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड ,सोयगाव