बीड जिल्हासामाजिक

प्रमोद टाकसाळ यांना युवा उद्योजक जिजाऊ रत्न पुरस्कारने सन्मानित

आठवडा विशेष|प्रतिनिधी
बीड दि.२९: ज्या वयात मुले हातात बॅट बॉल घेऊन खेळतात बागडतात त्या वयात पाणे हातोडी घेऊन आपला व्यवसाय सुरु करुन घरात मोठा आधार नसताना दुसऱ्याच्या हिते काम शिकवुन पैसे उसने घेऊन स्वतःचा ट्रक बॉडी, टँकर तसेच विविध लोखंडी, लाकडी अवजारे बनवण्याचा कारखाना गेवराई तालुक्यात मादळमोही सारख्या छोट्याश्या गावात उभारला असुन जिल्हाभरातुन त्यांच्या आवजाराला चांगली मागणी आहे यामुळे कमी वयात जिल्हाभरात आपल्या कर्तृत्वावर आपले नाव निर्माण केल्या मुळे महाराष्ट्र राज्य निर्भिड पञकार संघ बीड यांच्या वतीने देण्यात येणारा २०१८ ते २०१९ या वर्षाच्या राज्यस्तरीय युवा उद्योजक जिजाऊ रत्न पुरस्कार प्रमोद टाकसाळ यांना देण्यात आला आहे यामुळे जिल्हाभरातुन युवा उद्योजक प्रमोद टाकसाळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.