जालना: शिरनेर मध्ये जन क्रांती संघ च्या वतीने मास्क वाटप

जालना:आठवडा विशेष टीम―कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा फैलाव पूर्ण जगभर झाला.याच संसर्ग भारतात ही मोठ्या प्रमाणात झाला आहे.(कोविड १९)कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशामध्ये २१ दिवसाचा लॉकडाऊन ठेवला आहे.कोरोना या अतिसंसर्गजन्य विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रशासन सज्ज आहे.सर्व सुरक्षेची धुरा आज आपले डॉक्टर ,नर्स व महत्वाचे म्हणजे पोलीस कर्मचारी दिवसरात्र आपल्या कुटुंबापासून दूर राहून जनतेच्या सुरक्षेची काळजी घेत आहे.या सर्व गोष्टी लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जन क्रांती संघ चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप घुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड तालुका संघटक श्री. किरण लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली शिरनेर गावातील रेशन घ्यायला आलेल्या महिला व पुरुष आणि गावातील नागरिकांना संघटनाच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले. यावेळी वसंत बघाटे,सतीश गायके,बबन गायके,भागवत बघाटे,सचिन घुगरे, महेश बघाटे, किशोर घुगरे, राम वैद्य आदी.