आनंद गॅसकडून १५० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील हिंदूस्थान पेट्रोलियम
कार्पोरेशन लिमिटेडच्या आनंद गॅस सर्व्हिस यांच्या कडून गुरूवार,दिनांक 9 एप्रिल रोजी 150 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

आनंद गॅस सर्व्हिस यांच्या गोडावून येथे अंबाजोगाईचे तहसिलदार संतोष रूईकर,शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिध्दार्थ गाडे,राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,आनंद गॅस सर्व्हिसचे संचालक अॅड.अनंतराव जगतकर,काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगवानराव ढगे यांच्या हस्ते सिद्धार्थनगर, परळी वेस,मिलिंदनगर आणि बोधीघाट येथील 150 गरजू कुटुंबांना 15 दिवस पुरेल एवढे जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. अंबाजोगाई शहरात आनंद गॅस सर्व्हिसची 1986 साली सुरूवात झाली.प्रारंभीपासूनच ग्राहकांना तत्पर,जलद व घरपोहोच सेवा देणारी एजन्सी म्हणून आनंद गॅसकडे पाहिले जाते. यामुळेच सर्व ग्राहक हे
आनंद गॅस सर्व्हिसच्या सेवेबद्दल समाधानी व आनंदी आहेत.सध्या या एजन्सीत 52 कर्मचारी कार्यरत आहेत.आनंद गॅस सर्व्हिसचे संचालक अॅड.अनंतराव जगतकर हे सामाजिक कार्यांत सातत्याने पुढाकार घेऊन विविध सामाजिक उपक्रमात कायमच सहभागी होतात.कोरोना साथ आजाराच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्याचे कार्य करून आनंद गॅस सर्व्हिस यांनी शहरवासियांसमोर चांगला आदर्श ठेवला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात असलेल्या ‘लॉकडाऊन’ मुळे हातावर
पोट असलेल्या मजूर,रोजंदारी करणा-या कामगारांचे हाल होत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.अशा कुटुंबांना जगतकर यांनी मदतीचा हात दिला आहे.आनंद गॅस सर्व्हिसच्या माध्यमातून अॅड.जगतकर यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वञ स्वागत होत आहे.शहरातील हातावर पोट असणा-या,मोलमजुरी करणा-या ज्यात स्ञी-पुरूष सफाई कामगार,घरकाम करणा-या महिला भगिनी व गरजूंना लोकांना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप ‘सोशल डिस्टन्सिंगचा’ नियम पाळून करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक शशिकांत सोनकांबळे,रमेश सोनकांबळे,देवानंद जोगदंड,पञकार रमाकांत उडाणशिव,रणजित डांगे यांची उपस्थिती होती.

शासनाने दिलेल्या सूचनांचेे जनतेने पालन करावे

आनंद गॅस सर्व्हिस कडून गरजूंना 15 दिवस पुरेल एवढे जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले आहे. तसेच आणखी गरजूंची यादी करून असे साहित्य वाटप केले जाणार आहे.शहरातील जनतेने शासनाने दिलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन करावे. शहरामध्ये नवीन आलेल्या लोकांची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावीत.अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच कुटुंबातील एकानेच दिलेल्या वेळेत बाहेर येऊन आपले काम झाले.की, लगेच घरी जावे.शक्यतो घराबाहेर पडू नका.आपली व कुटुंबियांची काळजी घ्या. ―अॅड.अनंतराव जगतकर (संचालक, आनंद गॅस सर्व्हिस, अंबाजोगाई.)