कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारा गावातील सीमा बंदीचे सक्त आदेश ; कोणत्याही सामाजिक संस्थेला प्रवेश बंद , तालुका प्रशासन करणार जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा

पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आष्टीतील पिंपळा गावास भेट

आरोग्य विभाग देणार होम टू होम आरोग्यसेवा

आरोग्य पथकामार्फत दररोज होणार आरोग्य सर्वे

कडा:आठवडा विशेष टीम― जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार साहेब यांची गुरुवार दि -9 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता आंभोरा पोलीस चेक पोस्ट वरूनआंभोरा पोलीस स्टेशन कडे रवाना होऊन त्यांनी थेट कोरोनाग्रस्त पिंपळा तालुका आष्टी येथे साडेतीन वाजता गावांमध्ये जाऊन तेथील चेक नाका ,गावाच्या सुरक्षेसाठी बंद केलेले रस्ते, आरोग्य सुविधा ,कुटुंबाचे आरोग्य सर्वे ,नेमणुकीस असलेले कर्मचारी त्यांच्या वास्तव्यासाठी तंबू ,जेवण ,पाणी, शनिटायझर , गुणवतेचे मास्क, तसेच भौगोलिक नकाशाची पाहणी, गावातील रुग्णांचा आढावा, गावात अन्नधान्य वाटप याविषयी सविस्तर माहिती घेऊन आरोग्य सुविधा ,आरोग्य विभागाणी जाग्यावर देण्याचे सांगितले .यावेळी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, आष्टी तहसीलदार नीलिमा थेऊरकर, पोलीस उपविभागीय अधिकारी लगारे साहेब, अंभोरा पोलीस निरीक्षक कुकलारे साहेब, तालुका आरोग्य अधिकारी कोठुळे साहेब,शिक्षण विभाग भरारी पथक सदस्य बा .म.पवार , संतोष दाणी , शिवाजी आव्हाड ,सह पोलीस कर्मचारी , ग्रामविकास अधिकारी ,महसूल प्रशासन कर्मचारी होते.

यावेळी कोरोना ग्रस्त व तीन किलोमीटर क्षेत्रातील गावात गाव सीमा बंद केल्यामुळे कुठलीही सामाजिक संस्था थेट गावात जाऊन धान्य व इतर साहित्य वाटप करू शकणार नाही .

तालुका प्रशासनाने योग्य खबरदारी घेऊन स्वतः जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्हा बंदी असणाऱ्या आंभोरा चेक पोस्ट व अनिश्चित काळासाठी बंद असलेल्या 12 गावातील नियुक्त कर्मचारी यांना आरोग्य सुविधा सह जेवण नियुक्त ठिकाणी देण्याचे आदेश दिले.

याप्रसंगी आरोग्य सुविधा बाबत तालुका आरोग्य अधिकारी कोठुळे यांनी सांगितले की , गावबंदी केलेल्या गावातील अत्यावश्यक सेवेत प्रसूती व गंभीर आजारासाठी शासकीय वाहनातून जाग्यावरच सेवा दिली जाईल .

पिंपळा सह परिसरातील 12 गावात 12 ठिकाणी पोलीस चेक नाका उभारणी करून तंबू व बॅरिकेत सह सुविधा देण्याचे आदेश दिले. अंमळनेर , आष्टी ,पाटोदा , शिरूर ,येथील पोलीस स्टेशन मधील जास्तीचे पोलीस कर्मचारी वरील बारा गावात घेऊन अनिश्चित काळासाठी गावबंदी करण्याचे आदेश देखील दिले.जिल्ह्यातील पहिला
कोरोना बाधित रुग्ण आष्टी तालुक्यातील पिंपळा गावात आढळला. यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली. या अनुषंगाने पिंपळा गावाच्या चारही बाजुने 3 किमी ते 7 किमी पर्यंत 12 पोलीस नाके लावून सर्व भाग सिल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.9) पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पिंपळा गावात जावून परिस्थीतीचा आढावा घेतला. तसेच नागरिकांनी घाबरु नये, घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करावे असे अवाहनही त्यांनी यावेळी केले. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पुनरावलोकन बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी, तालूका आरोग्य अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हे हजर होते. आरोग्य विभाग आणि पोलीस यांच्या एकत्रित अशा 24 टिम तयार करण्यात आल्या आहेत. या टिम येणारे पुढील 14 दिवस सर्व घरोघरी जावून सर्व लोकांच्या आरोग्याची लक्षणे तपासणार आहेत. तसेच 11 गावांमध्ये जावून हे काम करणार आहेत. या संदर्भातील आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहे. बीड जिल्ह्यातील नागरिकांनी पिंपळा गावांमधील या कोरोनाग्रस्त परिस्थितीला कोणत्याही प्रकारे घाबरण्याची व भिती बाळगण्याची आवश्यकता नाही. प्रशासन योग्यते प्रत्येक पाऊल उचलत आहे. आपण घराच्या बाहेर निघू नये, संचारबंदीचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे अवाहन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले आहे.