अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील गंभीरे परिवारातील मुलांनी आपले वडील स्व.शहाजीराव गंभीरे यांच्या 5 व्या पुण्यतिथीनिमीत्त गुरूवार,दि.9 एप्रिल रोजी शहरातील 51 गरजू कुटुंबांना किराणाचे वाटप करून अत्यंत साधेपणाने सामाजिक बांधिलकी जोपासत पुण्यतिथी साजरी करून समाजासमोर नवा पायंडा पाडला आहे.
स्व.शहाजीराव गंभीरे यांचा 5 वा पुण्यतिथी कार्यक्रम कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या संचारबंदीमुळे गुरूवारी साध्या पध्दतीने करण्यात आला.यावर्षी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला कोरोनाची झालर दिसून आली.प्रारंभी स्व.शहाजीराव गंभीरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी सरपंच विद्याताई शहाजीराव गंभीरे,सरपंच अश्विनीताई विजय गंभीरे, नगरसेविका शिल्पाताई संजय गंभीरे,वंदनाताई दत्ताञय केंद्रे,डॉ.दत्ताञय केंद्रे,प्रशांत गंभीरे,आनंद जाजू,अॅड.बालाजी बडे, सुनील लाड,गणेश केंद्रे, पञकार दादासाहेब कसबे, संपादक परमेश्वर गित्ते, पञकार रणजित डांगे, पञकार मारूती जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती.दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त गंभीरे परिवार हा कीर्तन,अन्नदान आदी कार्यक्रम आयोजित करतो.यावर्षी कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या संचारबंदीमुळे सरकारच्या निर्देशाचे पालन करीत आप्तेष्ट,नातेवाईक व मिञ परिवार यांची गर्दी होणार नाही याची पुरेपुर दक्षता घेतली गेली.शासन आदेशाचे कुठेही उल्लंघन होणार नाही यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय गंभीरे यांनी सांगितले.तर प्रतिवर्षी किर्तन कार्यक्रमास भाविकांची मोठी उपस्थिती असते.मात्र,यावर्षी कोरोना साथ रोगाचा प्रादुर्भाव होवू नये व प्रतिबंधासाठी लॉकडाऊन आहे. दरम्यानच्या काळात संचारबंदी व समाजहित लक्षात घेता हा उपक्रम घेण्यात आला आहे.दरवर्षी होणारा पुण्यतिथीचा मोठा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.शासन सूचनेचे अनुपालन करीत घरच्याघरी फक्त पुजाविधी करण्यात आला अशी माहीती संजय गंभीरे यांनी दिली.किराणा वाटप कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी विशाल मुंदडा,राजेश भिसे,धनंजय हावळे,राहूल काचरे,महेश पवार,अतुल हावळे,बालाजी शिंदे,विश्वदीप पवार,राहूल कांबळे,रवि लाड,राहूल शेळके,ॠषिकेश शर्मा, प्रविण भिसे,आकाश भिसे, संदीप गुळभिले,नारायण कराड यांनी पुढाकार घेतला.