कोरोना विषाणू - Covid 19पूणे जिल्हाब्रेकिंग न्युज

खाकीवर्दीतल्या अंकुश मिसाळ यांनी पालात राहणाऱ्या गोरगरीब लोकांना मोफत मास्क , सॅनिटायझर आणि नाष्ट्याचे केले मोफत वाटप

पुणे:गणेश शेवाळे― खाकी वर्दीत असलेला दिलदार माणूस मंचर पोलिस स्टेशन मध्ये पोलिस खात्यामध्ये काम करत असलेले अंकुश मिसाळसाहेब यांनी आपल्या हद्दीमध्ये राहत असलेल्या गोरगरीब पालावर राहणाऱ्या नागरिकांना कोरोना विषय जनजागृती करून हा आजार किती भयंकर आहे याची माहिती सांगून कोरोना विषाणू संसर्गजन्य आजारा पासून दूर राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे व काय करुनय याची माहिती सांगून खोकला,ताप श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार घ्या कोरोना पासून सावधान राहण्यासाठी हे करा साबण व पाणी वापरुन हात स्वच्छ धुवा,शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरा,सर्दी किंवा फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळा,मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्या, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळा रोजची वापराची कपडे गरम पाण्याने धुवावे,अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडावे नसता घरात बसून रहावे स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवा ताप,खोखला श्वासोच्छवासात अडथळा लक्षणे आढळून आल्यास काळजी घ्या उपचारासाठी आपल्या जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा आशे आव्हान अंकुश मिसाळसाहेब यांनी करून आपल्या हद्दीतील गोरगरीब लोकांना कोरोना विषाणू पासून सावध कसे राहिले पाहिजे यांची माहिती सांगून पालावर राहत असलेल्या गोरगरिबांना मोफत नाष्टा ,मास्क व सॅनिटायझरची वाटप केली.