बीड जिल्हामहाराष्ट्र राज्यसामाजिक

बीड येथिल अनुलोम मित्रसंगम मेळाव्यास उदंड प्रतिसाद

बीड जिल्हा प्रतिनिधी बसवराज वाले यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पुर्ण केला म्हणून अभिनंदन करताना गणेश कवडे, गणेश शेवाळे,जितेद्र भोसले,बापु नवले,राहुल बामदळे,गोविंद बामदळे, हारिदास शेलार,दत्ता देशमाने,डॉ.नादे,रामदास भाकरे,गितेपाटील व इत्यादी

बीड (प्रतिनिधी): दि.२९ जानेवारी २०१९ रोजी बीड जिल्हा 'अनुलोम मित्रसंगम' कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला,या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या सत्रामध्ये विविध अतिथींनी उपस्थिती दर्शवली बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमोल एडगे सर, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रजोलन झाले ,कार्यक्रमाचे प्रस्ताविक बीड जिल्हा प्रतिनिधी बसवराज वाले यांनी केल तर मराठवाडा विभाग जनसेवक श्री विजय उक्कलगावकर यांनी अनुलोम कार्य विस्ताराची मांडणी केली,तसेच दुसऱ्या सत्रामध्ये आदर्श गाव पाटोद्याचे जनक श्री भास्करराव पेरे पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, तिसऱ्या सत्रामध्ये जिल्हा ग्रामउद्योग अधिकारी श्री सतीश खरात व एसबीआय ट्रेंनिग सेंटरचे अधिकारी शरद पाटोळे यांनी रोजगार मार्गदर्शन व स्वयंरोजगरामध्ये संधी या विषयावर मार्गदर्शन केले, कर्तुत्ववान प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अनुलोम सन्मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,तसेच प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले सोमय्या कॉलेजचे प्राचार्य डॉ. नरेंद्र पाठक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, व पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.या कार्यक्रमाला संपूर्ण बीड जिल्ह्यातील अनुलोम मित्र हजारोच्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम वेळेत सुरु होउन वेळेत संपला.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.