उन्हाळी हंगाम मुग बहरला ;सोयगाव तालुक्यात शेतकऱ्याचा प्रयोग

सोयगाव,दि.९:आठवडा विशेष टीम―
खरीपात अवकाळी पावसाने मुग पिकांची झालेली माती आणि रब्बी पिकांवर प्रारंभापासूनच आलेल्या रोग प्रादुर्भाव यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्याने जानेवारी महिन्यात उन्हाळी मुगाचा लागवड प्रयोग केला असतांना,हा प्रयोग अखेरीस मार्च महिन्यात यशस्वी झाला असून ऐन चटकदार उन्हात मुगाच्या शेंगा चमकत आहे.त्यामुळे घोसला शिवारात उन्हाळ्यातही मुगाच्या हिरव्या कच्च शेंगा पहावयास आणि खाण्यास मिळत असल्याचे चित्र आहे.
खरिपाच्या हंगामात अवकाळी पावसाने ऐन फुटव्याच्या काळात मुगाची माती केली होती काही भागात अवकाळी पावसाच्या पाण्यात बुडून मुगाची पिके काळसर पडल्याने शेंगासह या पिकांना उखडून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती,त्यामुळे यंदाच्या हंगामात मुगाची चणचण भासत असतांना घोसला शिवारातील शेतकरी चंद्रकांत एकनाथ बावस्कर यांनी गट क्रमांक ६० मध्ये तीन एकर उन्हाळी मुग लागवडीचा प्रयोग केला आहे.आणि हा प्रयोग यशस्वी ठरल्याने ऐन उन्हाच्या चटक्यात तालुक्यात घोसला शिवारात मुगाच्या हिरव्या शेंगा पहावयास आणि खाण्यास मिळत आहे.

उन्हाळी मुग लागवडीत या शेतकऱ्याने प्रायोगिक शेतीतून हा प्रयोग राबविला असून ऐन उन्हाळ्यात मावा,तुडटुडे यावर नियंत्रण मिळवीत हा प्रयोग यशस्वी केला आहे.उन्हाच्या चटक्यातही मावा आणि तुडतुडेचा प्रादुर्भाव झाला असतांना या शेतकऱ्याने चतुराईने यावर नियंत्रण मिळविले.

सध्या कोरोना संसर्गाच्या थैमानात मुगाचे भाव गगनाला भिडले असतांना,मात्र या शेतकऱ्याचा मुगाच्या शेंगा आगामी महिन्यात तोडणीवर येतील त्यामुळे पाच ते सहा हजार रु भाव मिळणार असल्याचा विश्वास शेतकऱ्याने व्यक्त केला आहे.

ठिबक सिंचनवर लागवड पद्धत-

ठिबक सिंचन वर पयोग करून या शेतकऱ्याने मुगाची लागवड केली असून यावर ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून हा प्रयोग राबविला असल्याने सूक्ष्म सिंचनावर या मुगाची जानेवारी महिन्यापासून वाढ केली होती.