औरंगाबाद: सोयगावसाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज,कोरोना संसर्गाच्या आढावा बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सूचना

जरंडी,ता.९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागावर कोरोना संसर्गाची एन्ट्री झालेली आहे.औरंगाबाद शहरासह बुलढाणा,जळगाव आदी सीमावर्ती भागात कोरोना संसर्गाचे रुग्ण सकारात्मक आढळलेले आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सोयगावच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची एन्ट्री झाली नाही पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे अशा कडक शब्दात सूचना गुरुवारी राज्यमंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगावला कोरोना संसर्गाच्या आढावा बैठकीत केल्या.
सोयगाव तहसील कार्यालयाच्या सभागुर्हात आयोजित बैठकीला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यंत्रणानिहाय उपाय योजनांचा आढावा घेतला,यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,मुख्याधिकारी सचिन तामखंडे,पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकर कसबे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे,प्रभाकर(आबा)काळे,जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव, रुग्ण कल्यान समितीचे अध्यक्ष नंदू हजारी,आदींची उपस्थीती होती,यावेळी नगर पंचायतीला शहरात तीन ठिकाणी सॅनिटायझर ब्रिज उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सोयगाव ग्रामीण रूग्णालयासाठी अतिआवश्यक सेवेसाठी २५ बेड,आमदार निधीतून उपलब्ध करून देत असल्याची घोषणा यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.दरम्यान ग्रामीण भागासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामीण जनतेला सुविधा पुरावा व त्यासाठी १४ व वित्त आयोगाची निधी व्याजाच्या रक्कमेसह कोरोना संसर्गाच्या उपाय योजनांसाठी वापरण्याच्या सूचना दिल्या.संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर असून अधिकाऱ्यांनी तातडीने आलेली अडचणींवर मात करावी निधी कमतरता भासू देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी बैठकीत सांगितले.यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी आता पर्यंत झालेल्या उपाय योजनांचा आढावा सादर केला.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी आरोग्याच्या बाबतीत कोरोना संसर्गाच्या तपासणी रुग्णांचा आढावा दिला.सोयगाव नगर पंचायतीला आमदार निधीतून तातडीने एक लाख रु निधी उपलब्ध करून देत असून तालुका आपला परिवार समजून नागरिकांची काळजी घ्या,हल्लीच्या काळात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर आणि पोलीस कमर्चारी जीव धोक्यात घालून काम करत आहे.त्यांना या सेवेचा मेवा मिळणार असल्याचे संकेतही राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी दिले.