कोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

मालेगाव येथुन आलेल्या ६ संशयितांना जळगाव हलवले

चाळीसगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―मालेगाव येथून आलेल्या 6 संशयितांना चाळीसगाव येथून जळगाव हलवण्यात आले असून सर्वत्र वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे
याबाबत माहिती घेतली असता वरील सर्व जण नात्यागोत्यातील आहेत तर सर्वांची मालेगाव येथील बाधित मृतकाच्या दफनविधीला उपस्थिती देखील असल्याचं कळते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    यात त्यांना मालेगाव येथून चाळीसगाव आणणाऱ्या रिक्षा चालकासह एकाच परिवारातील 5 जण असल्याच सूत्रांनी कळवलं आहे ही सर्व मालेगाव येथील मृत बाधिताचे नातलग असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली असुन तेथे दफनविधीच्या कार्यक्रमाला देखील यांची उपस्थीती होती अशी माहिती हाती आल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांना जळगाव जिल्ह्या रुग्णालयात हकवण्यात आल्याचं वैदकीय अधिकारी मंदार करंबळेकर यांनी सांगितले सांगितले तर खबरदारी म्हणून नगरपालिका आरोग्य अधिकारी प्रभारी मुख्याधिकारी तहसीलदार अमोल मोरे यांनी रथगल्ली आणि यांचा रहीवास असलेला कसाईवाडा देखील सील करण्यात आला असून नागरिकांना घराबाहेर न निघण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

    सील परिसरात फवारणी करून सेनेटाइज करणार - सभापती सायली जाधव

    दरम्यान नगरपालिका आरोग्य सभापती सायली रोशन जाधव यांचा हा प्रभाग असून त्यांनी लागलीच खबरदारी म्हणून आरोग्य विभागाला तातडीच्या उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत रथगल्लो, कसाईवाडा, परिसर सेनेटाईज करण्यात येणार असून आजच त्यासाठी नगरपालिका कर्मचारी कामाला लागली असल्याची माहिती त्यांचे पती रोशन जाधव यांनी कळवले आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये खबरदारी म्हणून सर्वांच्या तपासणी साठी त्याना जळगाव हलवण्यात आलं आहे त्यांचे रिपोर्ट अजून आलेली नाहीत