आपत्कालीन स्थितीमध्ये जिव धोक्यात घालुन काम करू लागले ; सर्व महसूल अधिकारी , कर्मचाऱ्यांनाही विमा संरक्षण द्या―परमेश्वर राख

बीड:आठवडा विशेष टीम― राज्यात उद्भवलेल्या कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये धान्य पुरवठ्यापासुन ते चेक पोस्टवरील तपासणी पर्यंतची कामे महसल विभागातील अधिकारी कर्मचारी करत आहेत. सदरील काम करत असताना सतत जनतेच्या संपर्कात यावे लागत असुन स्वत:चा जिव धोक्यात घालुन प्रत्येक अधिकारी, कर्मचारी तितक्याच जबाबदारीने काम करत आहे. त्यामुळे सर्व महसुल अधिकारी, कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जिल्हा शाखा बीडच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. बीड येथील राज्य तलाठी संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची आखणी व अंमलबजावणी, धान्यपुरवठा, कायदा व सुव्यवस्था राखण, राज्यातील-परराज्यातील व्यक्तींचा शोध घेवुन त्यांची राहण्याची सोय करणे, जिवनावश्यक वस्तंचा परवठा करणे. सर्व जिल्ह्यातील व्यक्तींची व जिल्ह्यातून बाहेर गेलेल्या व्यक्तींची यादी प्रत्येक गावात जावून तयार करणे, संशयीत व्यक्तींना घरामध्ये ठेवुन त्यांच्यावर लक्ष ठेवणे, चेकपोस्टवर थांबुन इतर वाहनांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करणे, संचारबंदी शिथील कालावधीत गर्दी न होण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणे आदी कामे महसुल विभागातील जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळाधिकारी, अव्वल कारकुन, लिपीक, तलाठी, शिपाई, कोतवाल, वाहन चालक हे आपल्या कुटुंबाची कोणतीही पर्वा न करता करीत आहेत. सदरील कामे करत असतांना जनतेचा संपर्क येतो. त्यामुळे सदर विषाणुची लागण कर्मचाऱ्यांना झाल्यास व दुर्देवाने त्याच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास त्याचे कुटुंब उध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना ५० लाख रूपयांचे विमा सरंक्षण शासनामार्फत देण्यात यावे, काही दुर्घटना घडल्यास महसुल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वाचा लाभ द्यावा, पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्याप्रमाणेच त्यांचेही वेतन कपात करण्यात येवू नये, कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर परवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अध्यक्ष परमेश्वर राख, केकाण,महसुल कर्मचारी संघटनेचे महादेव चौरे, जयवंत तळीखेडे, संदर काकडे, परमेश्वर चाफाकानडे, सुजित पारवे, शिरीष मोहेकर, रामेश्वर गंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.