ज्ञानेश्वर धोंडू पाटील―मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जेईएस महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सूर्यकांत रतन चौगुले यांना आय. सी. एम. डी. आर. 2020 आंतरराष्ट्रीय परिषदेत शैक्षणिक क्षेत्रात सतत सक्रिय राहून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ. चौगुले हे मागील १५ वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात संशोधन कार्यात सहभागी होत असून त्यांचे वाणिज्य विषयातील विविध पुस्तके आणि शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. याचबरोबर त्यांना विविध परिषदेत उत्कृष्ट संशोधक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यांची फलश्रुती म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
त्यांच्या यशाबद्दल जेईएस संस्थेचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तमजी बगडिया, सचिव श्री श्रीनिवासजी भक्कड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुखदेव मांन्टे, डॉ. महावीर सदावर्ते, डॉ. सुनील भावसार, डॉ. आनंद कुलकर्णी, डॉ. संकेत चौबे, डॉ. दीपा राठी, कु. नाथांनी, कु. देशपांडे, कु. केनिया, डॉ. हेमंत वर्मा, डॉ. नागनाथ शेवाळे, प्रा. प्रवीण पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.