#Coronavirus कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फीसची सक्ती करु नये – मनोज जाधव

बीड:आठवडा विशेष टीम― कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे सध्या सर्वच पालक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.त्याच बरोबर येणारा काळ देखील पालक समोर आव्हान उभा करणारा आहे.यातच बहुतांश पालकांनी आपल्या पाल्याची चालू शैक्षणिक वर्षतील दुसऱ्या टप्प्याची फीस भरणे बाकी आहे.ही फीस भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये असे परिपत्रक शिक्षण विभागाने काढलेल्या मुळे पालकांना दिलासा मिळणार आहे. त्याच बरोबर या वर्षी होणाऱ्या परीक्षा देखील कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत. पाहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थांना पुढील वर्गात थेट प्रवेश मिळणार आहे. असे केंद्रीय उच्च शिक्षण मंडळाने ( सीबीएसई ) जाहीर केले आहे.शैक्षणिक वर्ष २०२० -२१ करिता प्रवेश प्रक्रिया ही एप्रिल ,मे महिन्यातच सुरू करण्यात येते. तश्या प्रकारच्या जाहिराती देखील शाळांकडून सुरू झाल्या आहेत.बंदीचा विचार करता या प्रवेश प्रक्रिया स्थगीत करून बंदी उठल्या नंतर प्रवेश प्रक्रिया सुरू कराव्यात अशी मागणी शिवसंग्रामचे नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली आहे.