पाटोदा:आठवडा विशेष टीम― कोरोणाच्या संकटाशी लढताना पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार यांच्या बरोबरच पत्रकार हा देखील एक घटक महत्त्वाचा असून पाटोदा शहरातील पेट्रोल पंपावर पत्रकारांना पेट्रोल बंद केले आहे. यामुळे लोकशाहीचा खरा आधारस्तंभ व समाजाचे मुख्य प्रश्न सोडणाऱ्या पत्रकारांना प्रशासनाकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असून जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी योग्य निर्णय घेऊन पत्रकारांना पेट्रोल पंपावर पेट्रोल देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पत्रकातून होत आहे .आज समाजामध्ये गोरगरीब मोलमजुरी करणा-यांना उपासमारीची वेळ आली असताना सामाजिक भावनेतून पाटोदा तालुक्यातील दयानंद सोनवणे कार्यारंभ पत्रकार ,संजय सानप लोकाशा पत्रकार, हामिदखान पठाण बीड सिटीजन पत्रकार, दत्ता देशमाने झुंजारनेता पत्रकार ,अनिल गायकवाड लोकमत पत्रकार यांच्या माध्यमातून गोरगरिबांना किराणा वाटप करण्यात येत आहे. गोरगरिबांचे भूक भागवण्याचे कार्य पत्रकार बांधव करताहेत लेखणीच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आवाहन करून अनेक दानशूर लोक पत्रकारांच्या मदतीला येत आहेत व आज कोरोणाच्या संकटात पोलीस डॉक्टर, सफाई कामगार बरोबरच पत्रकार देखील मोलाची सामाजिक भान ठेवून कार्य करत असताना फक्त पत्रकारांना पेट्रोल बंद करून होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी पत्रकारांकडून होत आहे.