माजलगाव:आठवडा विशेष टीम― शहरातुन खामगांव पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. शहरातील आझाद नगर मधील सर्व सांडपाणी या रस्त्याच्या कडेने व्यवस्थित काढुन न दिलयामुळे वारंवार सांडपाणी हे या रस्त्यावर येत असून आझादनगरच्या कॉर्नरला मोठया प्रमाणात हे पाणी जमा होत असल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे तर दुसरीकडे हे पाणी रस्त्यावरुन बाहात असल्याने रस्त्याचे देखील नुकसान होत आहे मागील चार पाच महिन्यांच्या कालावधीत अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सांडपाण्याच्या घाणीला आता राष्ट्रीय महामार्ग देखील वैतागला असे म्हणन्याची वेळ आली आहे. आझादनगर हा परिसर तसा माजलगांव शहरातील दाट लोकवस्ती असलेला परिसर आहे. या परिसरात विविध समाजाचे हजारो लोक राहतात. अरुंद रस्ते त्यातच नाल्या असा हा झोपडपटटीवजा परिसर आहे. खाजगी मालकी व नागरीक यांच्या वादातील हा परिसर असल्यामुळे या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने कसल्याही प्रकारची विकास कामे झालेली नाही एव्हाणा पालिकेला ती करता येत नाहीत त्यामळे जमेल तसे येथील लोक राहतात तसेच येथील नागरीक हे गरीब परिस्थितील असल्यामुळे वैयक्तिक पातळीवर सुविधा उपलब्ध करुन घेणे त्यांना शक्य नाही. दाट लोकवस्ती असल्यामुळे येथील सांडपाणी देखील मोठया प्रमाणावर निघते हेच पाणी कॉर्नरवर असलेल्या एका नळकांडी पलाद्वारे रस्त्याच्या पलीकडील बाजला जाते मात्र या नळकांडी पलात कांही अडकल्यास मोठीच अडचण निर्माण होते व हे साचलेले पाणी मग नागरीकांच्या जिवावर उठते. विशेष म्हणजे पाणी ज्या ठिकाणी साचते त्याच ठिकाणी या भागाला विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफार्मर देखील बसविलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी मोठाच धोका निर्माण झालेला आहे. वारंवार साचत असलेल्या पाण्यामुळे जिव मुठीत धरून येथील नागरीकांना रहावे लागत असल्याने यावर नगर पालिकेने त्वरित सांडपाणी व्यवस्थापानाचा कायमस्वरूपी पर्याय काढावा अशी मागणी येथील नागरीकांकडून होत आहे..