सर्पराज्ञीत ऐश्वर्या माकडावर यशस्वी शस्त्रक्रिया ;निकामी झालेला हात काढून टाकला

शिरूर:आठवडा विशेष टीम― विद्युत तारेचा शॉक लागून उजवा हात निकामी झालेल्या ऐश्वर्या (नामकरण) माकडावर सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात निकामी झालेल्या हात काढून टाकण्याची शझाक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. काल जिल्हा पशुधन आयुक्त डॉक्टर रविकुमार सुरेवाड व पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय चौरे यांना या कामी यश आले आहे. सध्या ऐश्वर्याच्या तब्बेतीत सुधारणा हात असल्याची माहिती सर्पराज्ञीच्या संचालकानी दिली. बीड येथे विद्युत तारेचा शॉक लागून हे माकड जखमी झाले होते. उजवा हात पूर्ण भाजून मांसाच्या अक्षरशः चिंधड्या चिंधड्या उडाल्या होत्या. हाताच्या हाडांचा फक्त सांगाडा राहिला होता.खांद्यात खोलवर जखम असल्याने गैंगरीन होऊ नये म्हणून खांद्यापासून हात काढणे गरजेचे होते. बीड येथील जिल्हा पशुधन उपायुक्त डॉक्टर रवीकुमार सूरेवाड व पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विजय चौरे यांनी सर्पराजीत यशस्वी शस्त्रक्रिया करून निकामी झालेला हात काढून टाकला. सध्या ऐश्वर्याच्याया तब्येतीत सुधारणा होत आहे. महिनाभरापूर्वी हे माकड बीड येथील आंगद लकडे यांना आढळून आले होते. त्यांनतर त्यांनी वनविभागाशी संपर्क साधून त्यांच्या स्वाधीन केले. त्यांनतर बाविभागाने हे माकड पुढील उपचारासाठी विभागीय वन अधिकारी मधुकर तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे, वनपाल दिनेश मोरे,बनरक्षक बळीराम यादव वनकर्मचारी राजेंद्र कोकणे यांनी सर्पराज्ञी आणले होते. सर्पराजीत ऐश्वर्याची शुश्रूषा सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनवणे हे करत आहेत .ऐश्वर्या प्रकतीत सुधारणा होत असून लवकरच विभागीय बाधिकारी (सामाजिक) अमोल सातपते हे ऐश्वर्याच्या भेटीस येणार असल्याची माहिती सर्पराजीच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांनी दिली.