बीड: एपीएलचे वितरण धिम्या गतीने; लाभार्थ्यांची दुकानदारांशी हुजत

एप्रिलचे नियतनाबरोबरच एपीएलचे धान्य न दिल्याने पंचायत

बीड:आठवडा विशेष टीम― जिल्हा प्रशासनाकडून एप्रिल महिन्याचे नियतन रेशन दुकानदारांना वितरीत करण्यात आले. मात्र हे नियतन फक्त अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतीलच होते. एपीएल शेतकन्यांचे वितरण अद्यापही रेशन दुकानदारांना करण्यात आलेले नाही. रेशन दुकानादारांनी ज्या योजनेचे रेशन आले होते. ते शिधा पत्रिका धारकांना वाटप केले. मात्र एपीएल शेतकऱ्यांचे रेशनच न आल्याने ते शिधा पत्रिका धारकांना वाटप करु शकत नाहीत. असे असतांना लाभार्थी मात्र रेशन आले आहे. तुम्हीच आम्हाला देत नाहीत असे म्हणत रेशन दुकानदारांशी हुज्जत घालत आहेत. दरम्यान एपीएल शेतकऱ्यांचे धान्य वितरण अंत्यत धिम्या गतीने सुरू असल्याने रेशन दुकानदारांना शिधापत्रिका धारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांचे धान्य रेशन दुकानदाराला वितरीत करण्यात आले आहे. दुकानदारांकडून त्याचे शिधापत्रिका धारकांना वाटप सुरू आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून एपीएल शेतक-यांचे धान्य अद्यापही रेशन दुकानदाराला देण्यात आलेले नाही. एपीएल शेतकरी लाभ धारक रेशन दुकानदारांकडे गेले असता दकानदारांकडून ‘तुमचे धान्य जिल्हा प्रशासनाकडून अद्याप आम्हाला “पान ५ वर

धान्य मिळाले. वाटपास वेळ कमी

रेशन दुकानदाराला नियतन मिळाले आहे. मात्र हे शिधा पत्रिकांना वाटप करण्यासाठी वेळ कमी पडत आहेत. कारण जिल्हाधिका-यांनी संचारबंदी लागू केलेली आहे. दिवसा आड केवळ ७ ते ९.३० या अडीच तासाचाच दुकानदारांला रेशन वाटपास मिळत आहे. या वेळेत केवळ पंचेदीस ते तीसच कार्ड धारकांना वाटप करणे शक्य होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकायांनी रेशन दुकानदारांला बाटपास वेळ वातवून द्यावा अशी मागणी रेशन दुकानदारांकडून केली जात आहे.