कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमाजळगाव तालुकाविशेष बातमी

रिक्षाचालक हवालदिल - रिक्षाचालकांना तातडीने आर्थिक मदत करा ;बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी

सीटू सलंग्न रिक्षाचालक मालक संघटना

बीड:आठवडा विशेष टीम― रिक्षाचालकांची स्वत:च्या मालकीची रिक्षा असूनही त्यावर नियंत्रण ठेवणारया सरकारने आता रिक्षाचालकांच्या निर्वाहाची जबाबदारी घेऊन किमान कोरोना काळात तरी त्यांना मोफत धान्य व तातडीने १५००० रुपये आर्थिक मदत त्यांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी सीटू सलन ऑटोरिक्षाचालक मालक संघटना लाल बावटाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात पुढे म्हंटले आहे की, २३ मार्च पासून लाक डाऊन झाल्यामुळे रिक्षाचालक यांची अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील रिक्षाचालकांची संख्या हजारोबर आहे,त्यांच्यातील काही मालक,तर काही फक्त चालक आहेत,अनेक बेरोजगार युवक नोकरी मिळत नाही म्हणून या व्यवसायात आहेत.अनेकानी कर्ज काढून रिक्षा घेतल्या आहेत.सगळे सुरु असताना त्यांचे घरे चालत आहेत.आता मात्र हतावर पोट असणाऱ्या रिक्षा चालक यांचे लॉकडाउन आणि संचारबंदीने त्यांचे हाल सुरु आहेत,व्यवसाय बंद असल्याने उतपन्न नाही,कुटुंब जगवायचे कसे असा प्रश्न त्यांच्या समोर आहे.या बंद काळात हतावर पोट असणान्या सर्व रिक्षाचालकांची जबाबदारी शासनाने घ्यावी,व त्यांना तातडीने १५००० रुपये आर्थिक मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी सीटू सलंग्न आँटोरिक्षाचालक मालक संघटना लाल बावटाने केली आहे निवेदनावर कॉ शेख च्नूका सादेक पठान अहेमद खान,शेख महेबूब,उस्मान खान,शेख मुबारक,नसीर खरेशी,शेख अनवर,शेख अखील,सय्यद हदीस,डाके सखाराम,शेख तौफीक यांच्या सह्या आहेत.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?