बीड:आठवडा विशेष टीम― कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी किंबहुना प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार बीड जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांची टीम विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचा-यांच्या सहकार्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून सर्व ती सूक्ष्म खबरदारी घेत आहोत. प्रशासनामार्फत सतर्कतेच्या अनेक उपाययोजनांपैकी एक म्हणजे परजिल्ह्यात कार्यरत असलेल्या परंतु मूळ बीड जिल्ह्यातील असलेली प्रामुख्याने ऊसतोड मजुराची तसेच नोकरदारांची तात्पुरत्या निवारा शेडमध्ये करण्यात आलेली व्यवस्था, वडवणी तालुक्यात अशी व्यवस्था प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कोठारबन, जिल्हा परिषद शाळा, परडी आणि जिल्हा परिषद शाळा, उपळी येथे करण्यात आली आहेआतापर्यंत या तात्पुरत्या निवारा शेडमध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कोठारबन येथे २७ तर परडी माटेगाव येथे ५ आणि उपळी येथे १२ स्थलांतरीत आहेत. कोठरबन येथे पुण्याहून आलेली स्वतः च्या घरात क्वारंटाईन करून घेतलेली एक व्यक्ती आहेगटविकास अधिकारी श्रीमती एम. एसकांबळे नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्या म्हणाल्या, सांगली आणि सातारा जिल्ह्यात हे ऊसतोड मजूर कामासाठी गेले होते. ते बीड जिल्ह्यात आल्यानंतर खबरदारी म्हणून त्यांची जिल्हा परिषद शाळा, परडी आणि जिल्हा परिषद शाळा, उपळी तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कोठारबन येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांची राशनची सोय करण्यात आली आहे.