बीडमध्ये कुपनवरून गुटख्याची तस्करी ; ४० कोटिचे कुपन केले जप्त

बीड:आठवडा विशेष टीम― गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना कळाले की मिलीया स्कुल जवळ भालदारपूर पेठ बीडमध्ये गुटख्याच्या पैशाचे कुपन असल्याचे कळाले. त्यानुसार पेठ बीड पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली असता घराच्या बाहेर असलेल्या पत्र्याचे शेड आहे. तेथे असलेल्या ट्यूबमध्ये दोन ढिग आढळून आले.त्यानंतर पोलिसांनी ढिगामधील टायरचे ट्यूब बाजूला केले असता सदर ढिगांमध्ये पांढऱ्या रंगाच्या दोन पोत्यांमध्ये बॉक्स मिळून आले. त्या बॉक्समध्ये प्रिमीयम राजनिवास सुंगधीत पानमसाला कुपनचे बंडल मिळून आले. सदरचे कुपन बंडल्स पोलिसांनी जप्त केले असून एकंदरीत कुपननुसार विल्हेवाट लावलेल्या प्रिमीयम राजनिवास सुगंधी पान मसाल्यांची एकूण किंमत ४०,२४,२६,००० रूपये होती. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस प्रशासनाच्या वतीने सध्या जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे पोलिस अधिक्षकांनी क ड क कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पेठ बीड पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, महेबुब खान रा.छोटी मिलीया स्कुलच्या जवळ भालदारपुरा बीड यांच्या घरातील पत्र्याच्या शेडमध्ये महेबुब खाँजाखान पठाण रा.इस्लामपुरा याने शासनाने बंदी घातलेल्या नशाकारक प्रिमीयम राजनिवास सुगंधीत पान मसाला सेवन करण्याकरीता वेगवेगळ्या व्यापारी यांना विकण्यासाठी चिथावणी दिलेली असून सदर व्यापाऱ्यांच्या मार्फत प्रिमीयम राजनिवास पान मसाल्याची किंमत ४० कोटी २४ लाख २६ हजार रूपये मालाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केलेला असून सदर पान मसाल्याच्या पॉकिटामध्ये असणारे वर नमुद किंमतीचे स्क्रॅच कुपन संबंधित कंपनीला देवून त्या कुपनावरील रक्कम स्वत:ला आर्थिक फायदा मिळविण्यासाठी स्वत:च्या ताब्यात बाळगलेले असताना मिळून आली म्हणून अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भगवान भिसे यांच्या तक्रारीवरून शुक्र वारी पेठ बीड पोलिस ठाण्यामध्ये गु.र नं.१०५/२०२० कलम ३२८,१०९,१८८,२६९,२७०,२०१ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत हे करीत आहेत.