बीड : गोमळवाड्यात परजिल्ह्यातून  आलेल्या नागरिकांची तपासणी

शिरूर:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील गोमळ वाडा ग्रामपंचायत पुढे सरसावली असून मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यातून गावात आलेल्या सुमारे ३०० नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहेगावात औषधांची फवारणी करून परिसरचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गोमळवाडा ग्रामपंचायत विविध उपक्रम राबवत आहेकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या पूर्वी त्यांनी गावात येणारे सर्व रस्ते पत्रे, काट्या टाकून केले आहेत. आता ग्रामपंचायतीने घरोघर जाऊन प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करणे केले आहे. यात सुरुवातीस पुणे, मुंबई आणि इतर शहरातून आलेल्या २०० नागरिकांची आरोग्य तपासणी प्राधान्याने करण्यात आली आहे. यासह सर्वांना घरीच थांबण्याच्या सूचनाही ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.