बीड दि.११:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल स्वस्त धान्य दुकानदार सौ.शिलावती भालचंद्र गिरे आणि सतिश वायभट यांना डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील मोफत तांदूळ वाटप झाले आहे का? अशी विचारणा केली असता दोन्ही स्वस्त धान्य दुकानदारांनी चौसाळा येथिल गोडाऊन कीपर जवंजाळ यांनी अजून गोडाऊनलाच धान्य आले नाही, २-३ दिवस लागतील असे सांगितले. डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तहसीलदार आंबेकर यांना फोन करून विचारले असता असे होणे शक्य नाही म्हणत मी चौकशी करून सांगतो म्हणाले. याविषयी डॉ.गणेश ढवळे यांनी पत्रकारांच्या सोशल मीडिया ग्रुपवर वरील विषयी माहिती देताना जवंजाळ यांचा मो.नं दिला होता. याप्रकरणी पत्रकारांनी जवंजाळ यांना फोन वरून विचारणा केली असता सकाळीच लिंबागणेश येथिल स्वस्त धान्य दुकानदार यांनी धान्य घेतल्याचे सांगितले.
या प्रकरणी पत्रकारांनी डॉ.गणेश ढवळे यांना विचारणा केली असता दु.३ वाजेपर्यंत धान्य लिंबागणेश येथे पोहोचले नव्हते.यासंबधी स्वस्त धान्य दुकानदार भालचंद्र गिरे यांच्याशी फोनवरून बातचीत करवुन दिली. व अद्याप धान्य मिळाले नसल्याचे सांगितले.त्यानंतर सायं. ४ वा चौसाळा येथिल गोडाऊन मधील पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील मोफत ५ कीलो तांदूळ पोहोच झाला.
१) सतिश वायभट स्वस्त धान्य दुकानदार क्रं २ यांना ५८ कट्टे म्हणजे २९ क्विंटल तांदूळ देण्यात आला. त्यांच्याकडे बीपीएल कार्ड धारक ४२ आणि अंत्योदय कार्डधारक ११० आहेत.
२) स्वस्त धान्य दुकान क्र.२ सौ.शिलावती भालचंद्र गिरे यांना १०५ कट्टे म्हणजे ५२ क्विंटल तांदूळ मिळाले आहेत.त्यांच्याकडे ५१ बीपीएल धारक ५२ आणि अंत्योदय कार्ड धारक २०० आहेत.
दूपारी ४ वा.धान्य मिळाले , संवेदनशील पत्रकारांच्या आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठपुराव्यामुळे लिंबागणेश येथे रेशन धान्य पोहोचले.
चौसाळा गोडाऊन कीपर जवंजाळ म्हणतात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील मोफत तांदूळ व एपीएल शेतकरी लाभार्थी योजनेतील गहु, तांदूळ गोडाऊनलाच आले नाहीत , तहसीलदार आंबेकर यांनी दुजोरा दिला नाही :- डॉ.गणेश ढवळे
आज महात्मा फुले जयंतीनिमित्त लिंबागणेश येथिल दोन्ही स्वस्त धान्य दुकानदार १) सौ.शिलावती भालचंद्र गिरे २) सतिश वायभट यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजना मार्फत मोफत ५ किलो तांदूळ प्रतिसदस्य आणि एपीएल शेतकरी लाभार्थी योजनेतील गहु आणि तांदूळ यांचे वाटप का केले गेले नाही तर दोन्ही स्वस्त धान्य दुकानदारांनी उत्तर दिले की चौसाळा येथिल गोडाऊन कीपर जवंजाळ यांनी सांगितले की आजुन गोडाऊनलाच धान्य आले नाही.
याप्रकरणी तहसीलदार आंबेकर साहेब यांना विचारणा केली असता असे होणे शक्यच नाही मी चौकशी करून सांगतो म्हणाले.
जिल्हाधिकारी मा.राहूलजी रेखावार यांना फोन केला असता फोन एंगेज लागत होता.
बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल स्वस्त धान्य दुकानदार
१ ) शिलावती भालचंद्र गिरे :- स्वस्त धान्य दुकान क्र. १ यांच्याकडे एकुण ४०१ कार्डधारक आहेत.
चौसाळा येथिल गोडाऊन किपर मा.जवंजाळ यांनी सांगितले पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रति सदस्य ५ कीलो मोफत तांदूळ अजुन गोडाऊन मधे आला नाही २-३ दिवस लागतील.
२) सतिश वायभट :- स्वस्त धान्य दुकान क्र.२ यांच्याकडे एकुण १५० कार्डधारक आहेत.
चौसाळा येथिल गोडाऊन कीपर जवंजाळ यांच्या म्हणण्यानुसार अजून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील प्रति सदस्य मोफत ५ कीलो तांदूळ गोडाऊनलाच आला नाही.
एपीएल शेतकरी लाभार्थी योजनेचा माल आलाच नाही:- स्वस्त धान्य दुकानदार १)शिलावती भालचंद्र गिरे , स्वस्त धान्य दुकान नं.१ आणि २) सतिश वायभट ,स्वस्त धान्य दुकान नं २ यांचे म्हणणे आहे की एपीएल शेतकरी लाभार्थी योजनेचा प्रति सदस्य ३ कीलो गहू आणि २ किलो तांदूळ भाव :- १) गहु २ रु किलो २) तांदूळ ३ रु किलो
अजुन चौसाळा गोडाऊन कीपर जवंजाळ यांच्या म्हणण्यानुसार गोडाऊन मधेच आला नाही.
डॉ.गणेश ढवळे :-
१) जवंजाळ चौसाळा गोडाऊन कीपर फोन उचलत नाही
२) तहसीलदार आंबेकर साहेब यांना फोन करून माहिती दिली असता मी चौकशी करून सांगतो म्हणाले
३) मा.राहुलजी रेखावार साहेब, जिल्हाधिकारी बीड यांना फोन केला असता फोन एंगेज होता.
―डॉ.गणेश ढवळे
किसान सभा तालुकाध्यक्ष बीड