सोयगाव: अपंग व दिव्यांगांना अत्यावश्यक वस्तूंचे वितरण , जरंडी ग्रामपंचायतीचा उपक्रम

जरंडी:आठवडा विशेष टीम―येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना संसर्गाच्या संचारबंदी आणि लॉकडाऊन काळात गावातील दिव्यंगाची गैरसोय होवू नये यासाठी शुक्रवारी ४६ दिव्यांगांना अत्यावश्यक वस्तूचे कीट आणि किराणा सामानाचे वितरण सरपंच समाधान तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.
लॉकडाऊन काळात जरंडी ग्रामपंचायतीने संपूर्ण गावच लॉक डाऊन केले असल्याने गावाच्या बाहेर कोणालाही जात येत नसून गावातही नवख्यांना प्रवेश नसल्याने गावाचे थेट प्रवेशद्वाराच बंद करण्यात आले आहे.या काळात गावातील दिव्यांग आणि अपंग व्यक्तींची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने दिव्यांगांना अत्यावश्यक वस्तूंचे कीट आणि किराणा सामानाचे वितरण केले.यावेळी ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे,सरपंच समाधान तायडे,उपसरपंच सुनील पवार,दिलीप पाटील,मधुकर पाटील,लिपिक संतोष पाटील,अविनाश राठोड आदींनी पुढाकार घेतला.