जिल्हा परिषद अध्यक्षांकडून आरोग्य सेवा आणि ग्रामपंचायत यंत्रणांच्या कामांची पाहणी पाचोरा पंचायत समितीला भेट देऊन कोरोना संदर्भातमाहिती जाणुन घेतली

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना प्रल्हाद पाटील यांनी जाणून पूर्ण विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासन आपापल्या परीने कसोटीने प्रयत्न करीत आहे उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर आपले नैतिक कर्तव्य म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील प्रा आ केंद्रातील डॉ वैष्णवी पाटील, डॉ ज्ञानेश्वर यय्यांसे यांच्या कडुन आढावा घेऊन तसेच पुढे वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली दरम्यान लोहारी ग्रामपंचायत तसेच वडगाव कडे ग्रामपंचायतीला भेट देऊन तिथे सुरू असलेल्या उपाय योजनांची माहिती जाणून घेतली या प्रसंगी कोरोनाच्या लढाईत कार्यरत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेतील डॉक्टर्स कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर सहानुभूतीपूर्वक माहिती घेऊन त्यांच्या कार्याचे अध्यक्षांनी कौतुक केले. यावेळी त्यांचे समवेत पिंपळगाव जि प गटाचे सदस्य मधुकर काटे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पाटील सुनील पाटील स्वीय सहाय्यक पी आर चौधरी उपस्थित होते. वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रशेखर पाटील यांनी दवाखाना कार्यक्षेत्रातील बाहेरून आलेल्या एक हजार नऊशे नागरिकांच्य दक्षता आणि उपायोजनाविषयी माहिती दिली डॉ. मयुर पाटील डॉ,दिपाली सोनवणे उपस्थित होते पिंपळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ जोहरे यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजना संदर्भात माहिती दिली यावेळी डॉ शांतीलाल तेली ग्राम विकास अधिकारी नन्नवरे देवीदास पाटील ,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होत्या वडगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन आढावा जाणून घेण्यात आला यावेळी जि प सदस्य मधु कर काटे यांच्यासह सरपंच सुनील पाटील माजी सरपंच अतुल पाटील ,पोलीस पाटील सुनील पाटील आदी उपस्थित होते.

जि.प .अध्यक्षांच्या पाचोरा बीडीओंना सक्त सूचना- ग्रामविकासाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतीवर नियंत्रण करणाऱ्या पाचोरा पंचायत समितीला जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी अचानक भेट देऊन सुरु असलेल्या प्रतिबंधात्मक कामांबाबत आढावा जाणून घेतला प्रसंगी या युद्धसदृश परिस्थितीमध्ये सर्व कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी यांनी तत्परतेने लक्ष घालून सर्वंकष उपाय योजना राबवण्याचे विनंतीवजा आवाहन जिप अध्यक्षांनी केले प्रसंगी गट विकास अधिकारी विलास सनेर यांना जबाबदारीने काम करण्याच्या सूचना देखील जि प अध्यक्षांनी यांनी केल्या.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांनी पंचायत समिती सभागृहात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कर्तव्यात कसूर करणाऱ्या डांभुर्णी व पिंप्री बु. प्र. प्रा.येथील ग्रामसेवक विठ्ठल भरतसिंग पाटील यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पत्रकारांना दिली तसेच पाचोरा तालुक्यात परदेशातून आलेल्या अठ्ठावीस नागरिकांसह 4580 नागरिकांना घरीच विलगीकरण करून प्रतिबंधात्मक उपाय योजना पूर्ण केल्याचे सांगण्यात आले यावेळी पंचायत समितीच्या बैठकीत सोसियाल डिस्टिंगशन पाळण्यात आले प्रसंगी जि प अध्यक्षासमवेत जि प सदस्य मधुभाऊ काटे माजी सभापती बन्सीलाल पाटील, प्रज्ञावंत आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील, गटशिक्षण अधिकारी विकास पाटील,कक्षअधिकारी काळे, पंचायत समितीच्या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.