कोरोना विषाणू - Covid 19परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

डॉ.मधुकर आघाव यांच्या वाढदिवस निमित्ताने होणारा खर्च टाळून ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली 37 हजार रुपयांची मदत

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. याच उद्देशाने प्रा.डॉ.मधुकर आघाव सर यांच्या वाढदिवस निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून प्रा.डॉ आघाव यांचे चिरंजीव प्रतिक मधुकर आघाव यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 37 हजार रुपयांचा धनादेश प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात आला आहे.
देशभरात कोरोना व्हायरस प्रसाद दिवसेदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने मदतीचे आवाहन समाजातील घटकांना केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य प्रा.डॉ.मधुकर आघाव सर यांच्या 12 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. वाढदिवस न करण्याचा निर्णय घेण्यात आला. वडीलांच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधी कोविड 19 या नावे 37000 रुपयांचा तसेच जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी पीपी किटसाठी धनादेश जिल्हाधिकारी यांच्या वतीने परळीचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार डॉ. विपिन पाटील, नायब तहसिलदार बाबुराव रूपनर याच्याकडे शनिवार, दि.11 एप्रिल रोजी सुपूर्द केला आहे. महाराष्ट्र शासन कोरोनाच्या संकटाचा धैर्याने आणि कौशल्याने सामना करीत आहे, या प्रयत्नांना साथ देण्यासाठी ही मदत करण्यात आली आहे.
कोव्हिडं 19 अर्थात कोरोना या विषाणूला हद्दपार करण्यासाठी शासनाने योजलेले नियम पाळा व कोरोना टाळा, कोरोना" घालवण्यासाठी घरातच राहा घराबाहेर पडू नका; "शासनाचे नियम पाळा, आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन आघाव यांनी केले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?