केज(बीड):आठवडा विशेष टीम― माझ्या घरचा लाईटचा आकडा का काढायला लावला असे म्हणून लाईनमनला दगडाने मारहाण करून शिवीगाळ देऊन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी लाईनमनच्या तक्रारी वरून विडा येथील दोघा बापलेका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबतची माहिती अशी की शरद सुरेश घुटे हे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथे वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत. दि. १० एप्रिल रोजी ते त्यांचे सहकारी सय्यद वहिदोद्दीन हे देवगाव येथील रोहित्र दुरुस्त करण्यास जाण्यासाठी विडा येथील बस स्टँडवर उभे होते. त्यावेळी विडा येथील दत्ताजय संपतराव पटाईत हा लाईनमन शरद घुटे यांना म्हणाले की तु माझ्या घरचा लाईटचा आकडा का काढायला लावला ? त्यावर घुटे म्हणाले माझे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितल्यामुळे मला कार्यवाही करावी लागली. असे म्हणताच दत्तात्रय संपतराव पटाईत यांनी लाईमनला शिवीगाळ सुरु केली. त्यावर लाईनमन शरद घुटे हे त्याला म्हणाले तुम्ही येथुन जा. असे म्हणताच त्याचा मुलगा शुभम दत्तात्रय पटाईत हा पळत आला. त्याने त्याचे हातातील दगडाने लाईनमन शरद घुटे याच्या कंबरेवर हातातील दगड मारुन मुक्का मार दिला. तसेच दत्तात्रय पटाईत यांनी पण लाथा बुक्कयांनी मारहाण केली. लाईमन शरद सुरेश घटे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस स्टेशनला ग. र. नं. १४७/२०२० भा. दं. वि. ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६ नुसार दत्तात्रय पटाईत आणि त्याचा मुलगा शुभम पटाइत या दोघा बापलेका विरुद्ध गुन्हा दाखल करन्यात आला आहे.