कोरोना विषाणू - Covid 19क्राईमबीड जिल्हा

बनावट 'अत्यावश्यक पास' तयार करुन विक्री करणे आले अंगलट ; २१ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

माजलगाव:आठवडा विशेष टीम― बनावट पोलिस पास तयार करुन विक्री करणे तरुणाच्या अंगलट आले असून दिंदूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक वृत्त असे कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनच असून संचारबंदी मध्ये जिल्हा अंतर्गत फिरण्याकरिता अत्यावशक सेवेसाठी बीड जिल्हा पोलिसांनी ऑनलाईन पास उपलब्ध केल्या आहेत परंतु अशा पास नधुन मोबाइल च्या सहाय्याने छेडछाड करत नाव व गाडी नंबर बदलत बेलुरा येथील महेश अशोक फपाळ (वय २१ वर्ष) हा तरुण बनावट पास बनवत ३०० रुपयात विक्री करत होता. बेलुरा येथिल देसाई मोतीराम फपाळ यांना संशय आल्याने दिंदुड पोलिसात तक्रार करत सदर गुन्ह्याची माहिती दिली असता दिंदूड पोलिस स्टेशन चे सपोनि आनिल गव्हाणकर यांनी सदर तरुणास तात्काळ अटक करत मोबाईल जप्त केला असुन आरोपी महेश अशोक फपाळ याने किती जणांना बनावट पास बनवुन दिला आहे याचा तपास करीत असल्याचे सांगितले.दरम्यान देसाई मोतीराम फपाळ याच्या फिर्यादी वरुन गुन्हा नंबर ७८/२०२० कलम ४२०,४६५,४६८ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.