#Lockdown बीड: पाच स्वस्त धान्य दुकानावर निलंबनाची कारवाई

बीड:आठवडा विशेष टीम―राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्य लॉकडाऊन केले आहे. अश्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला धान्य पुरवठा करण्यासाठी रास्त भाव दुकानदारांना धान्य देण्यात आले आहे.मात्र बीड मधील काही दुकानदार धान्य देत नाहीत लाभाथीना नीट बोलत नाहीत कमी माळ देतात या कारणावख्न पाच दुकाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी आघाव पाटील यांनी निलंबित केली आहेत .सध्याच्या गंभीर परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील काही रास्त भाव दुकानदार दुकान उघडत नाही, धान्य नियमाप्रमाणे न देता कमी प्रमाणात देतात, ई-पोस मशीनची पावती देत नाही, शासनमान्य रकमेपेक्षा जास्त रक्कम घेतात, धान्य देत नाही, ग्राहकांची अडवणूक करतात, ग्राहांकासह अरेरावीची भाषा वापरतात अश्या तक्रारी प्राप्त झाले होते.सदर तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी,बीड प्रकाश आघाव पाटील यांनी बीड तालुक्यातील एकूण पाच रास्त भाव दुकानांचे परवाने निलंबित केले आहे व सदर निलंबित दुकाने नजीकच्या चांगल्या दुकानास जोडण्याबाबत तहसीलदार, बीड यांना आदेशीत केले आहे.निलंबित करण्यात आलेल्या दुकानांमध्ये रमेश सीताराम गंगाधर बीड दुकान क्रमांक ४१ , ज्ञानदेव कान्हू बांड घोसापुरी, चंद्रकांत रामभाऊ फाटले बीड दुकान कमांक ३४, चेअरमन फेअर प्राईस शॉप असोसिएशन – बीड दुकान क्रमांक १४ आणि चेअरमन फेअर प्राईस शॉप असोसिएशन बीड दुकान क्रमांक ०४ हि दुकाने निलंबित करण्यात आली आहेत या दुकानावरील कार्ड धारकांना नजीकच्या दुकानावर माल देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.