अहमदनगर जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19पाथर्डी तालुकाब्रेकिंग न्युज

#CoronaVirus पाथर्डी: खरवंडी कासार प्राथमिक आरोग्य केंद्र शोभेची वास्तु ; वैद्यकीय असुविधा व कर्मचाऱ्यांच्या अभावी रुग्णांची हेळसांड

पाथर्डी:आठवडा विशेष टीम― पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील प्राथमिक आरोग्य केन्द केवळ शोभेची वास्तु बनली आहे राष्ट्रीय महामार्गावर खरवंडी कासार शहर येत असुन या महामार्गावर अनेक अपघाती मृत्यु झाले आहेत खरवंडी कासार शहरासह बारा गाव वाड्या वस्त्या न वसलेले खरवंडी कासार हे शहर मध्यवर्ती केन्द आहे परंतु पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय सोडता व खरवंडी कासार येथील काही खाजगी दवाखाने वगळता रुग्णांच्या सेवेसाठी पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील प्राथमिक आरोग्य केन्दात वैद्यकीय उपचार मिळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे एक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नर्स सफाई कर्मचारी अशी अनेक पद या प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त आहेत औषधांचा मोठा तुटवडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे येथील डॉक्टर औषधाकरता खाजगी मेडिकल येथुन औषध घेण्याची सिफारस करत असतात कोरोणासारख्या विषाणुमुळे संसर्ग दिवसेदिवस वाढुन मृत्युचे प्रमाण वाढले आहे असे असताना अहमदनगर जिल्ह्यात कोरोणाग्रस्तांची संख्या तीसवर येउन ठेपली आहे पाथर्डी तालुक्यातील मानिकदौंडी येथील मकरज येथुन परतलेला नागरीक व नातेवाईक अशा बारा व्यक्तींना अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे लवकरच त्यांची तपासणी करून अहवाल येणार आहे परंतु या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली असुन चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे खरवंडी कासार येथील प्राथमिक आरोग्य केन्दांत अपुरे कर्मचारी औषधांचा तुटवडा व आरोग्य विभागाच्याबेजाबदारणीपणामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे खरवंडी कासार प्राथमीक आरोग्य केन्दांत अॅमबुलनसची सुविधा नसल्याने रात्री अपरात्री गोरगरीब ऊसतोड मजुर महिला आदी रुग्णांना खाजगी दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंन्द बंद असल्याने थेट जिल्हावारी करावी लागते त्यातच अपघाती रुग्ण असेल तर दुर्दवाने त्याला वैद्यकीय उपचाराअभावी प्राण गमवावा लागतो यामुळे अहमदनगर जिल्हा आरोग्य विभागाने लवकरात लवकर खरवंडी कासार प्राथमीक आरोग्य केन्दांत कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नर्स सफाई कर्मचारी इत्यादीची नेमणुक करुन त्यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश द्यावेत तसेच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपकरणे मुबलक औषध पुरवठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे खरवंडी कासार प्राथमीक आरोग्य केन्दांत अनेक वर्षापासुन बोगस कारभार चालु आहे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नर्स सफाई कर्मचारी इथे राहण्यास तयार नाहीत वैद्यकीय उपकरण औषधांचा तुटवडा असल्याने खरवंडीसह पंचक्रोशीतील रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे असे शैलेंद्र जायभाये माहीती अधिकार महासंघ पाथर्डी यांनी सांगितले. खरवंडी कासार येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नर्स सफाई कर्मचारी यांना मुख्यालयी थांबण्याचे लेखी आदेश काढले आहेत प्राथमिक आरोग्य केन्दातील आरोग्य कर्मचारी यांनी चोवीस तास रुग्णांना सेवा द्यावी कुठल्याही आरोग्य कर्मचार्याविरोधात रुग्णांची लेखी तक्रार प्राप्त झाल्यास निलंबनाचा प्रस्ताव वरीष्ठांकडे पाठवला जाइल असे डॉ भगवान दराडे आरोग्य अधिकारी पाथर्डी यांनी सांगितले.

Back to top button