बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

बीड शहरातील जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका , १ वर्षाचा टैक्स माफ करा – अमर नाईकवाडे

बीड:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणु संसर्गाच्या प्रादर्भावाने व दष्परिणामाने आज रोजी संपूर्ण जगासह आपला भारत देश आर्थिक परिस्थितीने होरपळत असताना देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री हे देशातील व राज्यातील जनतेला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्याचे काम करत असताना बीड नगरपरिषद मात्र टॅक्स वसुलीत दंगआहे. नगराध्यक्ष व सिओ साहेब परिस्थितीचं गांभीर्य ओळखून थोडी तरी बीड शहरातील जनतेवर दया दाखवा. शहरातील जनतेच्या संयमाचा अंत पाहूनका, चौदाव्या वित्त आयोगा मार्फत बीडनगर परिषदेला जवळपास १५ कोटींचा निधी येतो, शहरातील स्वच्छतेवर व पाणीपुरवठ्यावर १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्याची तरतूदअसतानाबळजबरीने करण्यातयेणारी वसुली थांबवाअसे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी म्हटले आहे. कोरोना विरुद्धच्या या युद्धजन्य स्थितीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनासह पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भूमिकेत आम्हीआहोत. जिल्हा प्रशासनातील मा.जिल्हाधिकारी,मा.जिल्हा पोलिस अधीक्षक व संपूर्ण आरोग्य यंत्रणा आपले कर्तव्य चोख वप्रामाणिकपणे बजावत असताना बिंदसराव माजलगाव धरण पाणीसाठा मुबलक असतानाही बीड नगर परिषदेने पाणीपुरवठ्याचा कालावधी दोन दिवसाने कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, ज्या भागात नाली मिश्रित पाणी येते तेथे तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करावा,शहरातील गल्लीबोळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड फवारणी करावी, धूर फवारणी व जंतुनाशक फवारणी जास्त क्षमतेने व मोठ्या स्वरूपात करावी,शहरात ठीक ठिकाणी झालेले कचऱ्याचे ढिगारे अगोदर साफकरावेत, शहरातील गोळा केलेला कचरा व नाल्यातील काढलेली घाण मोंढारोडवरील बिंदुसरा नदीपात्रात टाकणे तात्काळ बंद करावे. त्यामुळे बीड नगरपरिषदेने पाणीपट्टी व घरपट्टीच्या नावाखालीरजाकारी वसुली बंद करून शहरातील नागरिकांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने वरील उपाययोजना तात्काळ कराव्यात व शहरातील नागरिकांना एक वर्षाचा टॅक्स फ्री करावा असे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी म्हटले आहे.

बीड पालिकेकडून मा.उच्च न्यायालयाचा अवमानना

सध्याची परिस्थिती लक्षात घेता, नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून राज्यातील नगरपालिका महानगरपालिकांना नागरिकांच्या विरोधात काही कार्यवाही करायची असल्यास ती टाळावी किंवा संथ गतीने करावी असे मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी दिनांक २६ मार्च २०२० रोजी निर्देश दिले आहेत. माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असतानाही बीड नगरपरिपद मात्र सक्तीने टॅक्स वसूल करण्यात मग्न आहे. टॅक्स वसुली तातडीने बंद न झाल्यास हीषाष अॅड. सय्यद तौसिफ यांचे मार्फत मा मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या जाईल, असेही शेवटी अमर नाईकवाडे यांनी म्हटले आहे.