औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

सोयगाव: कंकराळा गावचे सरपंच चंदाताई राजपुत यांच्या वतीने गरजू १०० कुटुंबांना १ महिन्याचा किराणा सामानाचे वाटप

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव तालुक्यातील मौजे.कंकराळा गावचे सरपंच चंदाताई राजपुत यांच्या वतीने गरजू शंभर कुटुंबांना एका महिन्याचा किराणा सामानाचे किट आज वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणू चा प्रसार थांबविन्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी करण्यात आले असल्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे कंकराळा परिसरातील शंभर गरजू कुटुंबियांना कंकराळा गावचे सरपंच चंदाताई राजपुत यांच्या वतीने एक महिन्याचा किराणा सामानाचे किट वाटप करण्यात आले , यावेळी युवासेना नेते कुणाल राजपुत , शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप भाऊ मचै , माजी सरपंच शिवदास राजपुत, गणेश राजपुत , पंडीत वाघ , आकाश मख , गोरख पवार,प्रताप राजपुत,दिपक मचै , मोतीलाल घुसिंगे, राहुल बोराडे , भगवान ताटू , हिरालाल ढाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला व सरपंचांनी नागरिकांना सुचित केले की ' घरि रहा सुरक्षित रहा '.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?