कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजशेतीविषयक

कोरोनाने किसान पुत्रांच्या पिकात जनावरे सोडून नांगर फिरवण्याची वेळ आली―डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण आबदार यांना ५ एकर बागायती शेती असुन मुबलक पाणी असल्याने भाजीपाला उत्पादन ते दरवर्षी घेतात. यावर्षी मात्र कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाईत जिल्हा प्रशासनाने बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे त्यांनी २ एकर शेतीमधे पानकोबीची लागवड केली होती. मोठ्या कष्टाने प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी बेड बनवणे , औषध फवारणी , १०-१२ महिला मजूर प्रत्येकी ३०० रु.रोजाने लावुन पिक सूद्धा नेहमीप्रमाणे जोमात आले.मात्र कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्यामुळे माल शेतीतच पडून राहीला , कोबी उपटून बांधावर टाकण्यासाठी मजुर मिळेनात म्हणून शेवटी पिकात जनावरे सोडून छातीवर दगड ठेवून नांगर फिरवला आहे.

लक्ष्मण आबदार ( किसान पुत्र ):
दरवर्षी कोबी लावताना ५०,००० रु खर्च येतो, मात्र १५०’००० रु.पर्यत उत्पन्न बाजारपेठ उपलब्ध झाल्यावर मिळते. यावर्षी मात्र ५०,००० रु.चे नुकसानच कोरोनामुळे बाजारपेठा बंद करण्यामुळे झाले आहे.

सविता लक्ष्मण आबदार (शेतक-याची पत्नी ):

लागवड करताना मजूर महिला ३००रु.रोजाने येत होत्या . दोन मुलं आणि एक मुलगी आहे.शिक्षण घेत आहेत. यावर्षी मात्र मोठ्या कष्टाने पिक पदरात पडले होते परंतू या कोरोनाने बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे मजूर कोबी काढण्यासाठी मिळत नाहीत त्यामुळे नाईलाजास्तव कोबी पिकामध्ये नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.

डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर : किसान पुत्र आंदोलक जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार नियमांचे काटेकोर पालन करत आहे, त्यामुळे किसानपुत्रांचे नुकसान झाले तरी सूदधा जिल्हा प्रशासनाच्या पाठीशी उभे राहिले आहेत,त्याच प्रमाणे कोरोना प्रकरण संपल्यानंतर जिल्हा प्रशासनाने किसानपुत्रांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आर्थिक मदत करावी.तसेच शेतकरी विरोधी कायदे १) कमाल जमिन धारणा ( सिलिंगचा कायदा)
२) अत्यावश्यक वस्तू अधिग्रहण कायदा
३) जमिन अधिग्रहण कायदा रद्द करण्यात यावेत तरच शेतक-या भोवतीचा गळफास सुटेल अशी मागणी किसान पुत्र आंदोलक डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्य मंत्री उद्धवजी ठाकरे , कृषिमंत्री बाळासाहेब थोरात आणि ना.धनंजयजी मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांच्याकडे केली आहे .

Back to top button