सोयगाव:मुगापाठोपाठ चवळी बहरली ,ठिबक सिंचन वर उन्हाळी पेरण्यात सोयगाव तालुका अव्वल

सोयगाव,ता.१३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
मुगाच्या पाठोपाठ उन्हाळी चवळी पिकांनाही भर उन्हाळ्यात बहार आला असल्याने सोयगाव तालुक्यात उन्हाळी चवळी जोमदार झाली आहे.ठिबक सिंचनवर सोयगाव तालुक्यात इन्हाली पेरण्या पूर्ण क्षमतेने यशस्वी झाल्याचे यावरून दिसून आले आहे.
घोसला ता.सोयगाव शिवारात एका शेतकऱ्याने उन्हाळ्यात मुगाच्या पेरण्यांचा प्रयोग यशस्वी करताच काही शेतकऱ्यांनी चवळी पिकांचेही प्रयोग ठिबक सिंचन वर केल्याने उन्हाळी चवळी बहरत आलेली आहे.२५ हेक्टर क्षेत्रावर चवळी बहरल्याने उन्हाळ्यात चवळीच्या शेंगा खाण्याची मजा येत आहे.रब्बीच्या हंगामावर मक्याचे आणि ज्वारीच्या उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात मिळण्याची शक्यता मावळल्याने शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यातच प्रायोगिक शेतीवर भर दिला होता,यामध्ये आधी मुग पिकांचे प्रात्यक्षिक यशस्वी झाल्यानंतर चवळी पिकांचेही प्रयोग हाती घेतले असता,मार्च महिन्याच्या कडक उन्हात हिरवीगार चवळी खावयास मिळत आहे.

ठिबक सिंचनवर पाण्याचे नियोजन-

ठिबक सिंचनवर पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांनी भर उन्हात चवळीच्या कोवळ्या अंकुरांना वाढीस लावले,त्यानंतर यावर विविध फवारण्य करून या चवळी पिकांची रोग प्रतिकारक शक्तीही वाढविली असल्याने या चवळीच्या पिकांना मार्च महिन्यात बहार आला आहे.त्यामुळे सोयगाव परिसरात सर्वत्र उन्हाळी चवळी बहरलेली दिसत असून ऐन उन्हाळ्यात चवळीच्या हिरव्यागार शेंगा खाण्यास मिळत आहे.