अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई शहर व परिसरातील महिला,युवती या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत,स्वतःचा उद्योग व्यवसाय,लघुउद्योग करून कुटुंबाचा भार यशस्विरित्या सांभाळणार्या महिला भगिनींसाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली.पतसंस्थेची वाटचाल अतिशय चांगल्या रितीने सुरू आहे.पंचक्रोषीतील महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम ही पतसंस्था करीत असल्याचे सांगुन महिला सक्षमीकरणासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सौ.सुनिता राजकिशोर मोदी यांनी केले.
शहरातील गुरूवारपेठ येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संपुर्णपणे संगणकीकृत व सर्व सुविधांनी उपलब्ध असणारे कार्यालय आहे.पतसंस्थेच्या चेअरमन सौ.सुनिता मोदी यांनी पतसंस्थेच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख समोर ठेवताना सांगितले की,पतसंस्थेच्या विकासात व्हाईस चेअरमन सौ.शोभा बाबु खडकभावी,उपाध्यक्ष सौ.रूपाली सुधीर धर्मपात्रे, संचालीका सौ.संगीता विष्णु सरवदे,संचालीका सौ.राजश्री राहुल धाकडे,संचालीका सौ.उषा गणेश मसने,संचालीका सौ.अंजली विष्णुपंत मस्के, संचालीका सौ.सविता विजय रापतवार,संचालीका सौ.सुरेखा बाबुराव खंडाळे,संचालीका फारूखी परवीन नुजहत,संचालीका सौ.सायली सुहास मोहिते व सर्व महिला सभासद यांचे योगदान आहे.यावेळी शाखाधिकारी दिनेश शिवाजीराव सुरवसे यांनी 31 मार्च 2020 पर्यंतच्या पतसंस्थेच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली त्यानुसार पतसंस्थेची सभासद संख्या-2386,भागभांडवल-22 लाख 36 हजार,गुंतवणूक-75 लाख 91 हजार,एकुण ठेवी-3 कोटी 12 लाख 40 हजार,एकुण कर्जवाटप-2 कोटी 65 लाख 52 हजार तर निव्वळ नफा 30,929/- रूपये एवढा झाला असल्याचे सांगुन पतसंस्थेच्या यशात संस्थापक चेअरमन राजकिशोर मोदी,चेअरमन सौ.सुनिता राजकिशोर मोदी,व्हाईस चेअरमन सौ.शोभा बाबु खडकभावी यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच ठेवीदार,सभासद,ग्राहक, हितचिंतक,कर्मचारी सोनाली संजय समर्थ,मनिषा मनोज जैन यांचे सहकार्य लाभत असल्याचे व्यवस्थापक दिनेश सुरवसे यांनी यावेळी सांगितले.