लेख

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणस्पर्शाने पावन झाली मराठवाड्याची माती ; निजाम राजवटीत महामानवाची दोन वेळा मराठवाड्याला भेट

“महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज 129 वी जयंती आहे.कोरोनाचे संकट आणि लॉकडावून असल्याने आपण यंदा सार्वजनिक स्वरूपात आपण जयंती करू शकत नाही.तरी परंतु, आपण आपल्याच घरात महामानवाला अभिवादन करणे,महामानवाच्या विचारांचा जागर त्यांची ग्रंथसंपदा यांचा अभ्यास व वाचन करून,गरजूंना मदत करून करणे असे चांगले उपक्रम राबवून करू शकतो.लॉकडावून काळात या महामानवा बाबत सहज मागे वळून पाहतांना काही विचारवंताना संपर्क करुन त्यांच्याशी संवाद साधला.तेव्हा एक गोष्ट मात्र लक्षात आली.ती म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या मराठवाड्यात दोन वेळा येवून गेले.ज्यामध्ये मकरणपूर आणि कसबे तडवळे या दोन गावात. हि दोन्ही गांवे त्या काळात जळगाव आणि सोलापूर जिल्हयात होती. निजामाच्या बंदीमुळे त्या ठिकाणी परिषदा घेतल्या.आज हि दोन्ही गांवे औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत हे विशेष.”

अखंड भारतमाचे स्वप्न मनी ठेवून ज्या महामानवाने या देशाला एक संविधान,एक निशाण देतांना देशातील प्रत्येक नागरीक समान आहे.समतेचा धागा जपून बंधुत्वाचा नारा दिला.त्या महापुरूषाची आज 129 वी जयंती आहे.दरवर्षी आपण भारतभर मोठ्या प्रमाणात तब्बल संपूर्ण एप्रील महिनाभर विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून जयंती
साजरी करतो.मात्र,यंदा भव्य स्वरूपात व सार्वजनिक ठिकाणी जयंती साजरी करता येणार नाही याचे मनोमन दु:ख आहे. कोरोना संकट काळात संचारबंदी.मग,बाबांची जयंती कशी साजरी करायची.? मात्र घरबसल्या साजरी करता येईल.अशा महापुरूषाच्या काही आठवणी ? काही प्रसंग त्याला उजाळा देवून त्यांच्या बाबत नवीन पिढीला काही माहिती देणं शक्य आहे का.? म्हणुन मागे वळून पाहतांना त्यांच्या विचारांचे पाईक असणारे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांच्यासोबत संवाद साधताना काही प्रसंगावर त्यांनी चर्चा केली ? माहीती दिली.त्यावेळी या महामानवाचा आपल्या मराठवाड्याच्या मातीशी दोन वेळा चरणस्पर्श झाल्याचे कळले.मराठवाडा जेव्हा निजाम राजवटी खाली होता.तेव्हा दोन वेळा हे थोर महामानव आपल्याकडे येवून गेले. मुळात निजामाने त्यांच्यावर मराठवाडा बंदी घातली होती.कारण,त्यांच्या प्रभावी भाषणांमुळे मराठवाड्यातील जनता आपल्या विरोधात जाईल याची भिती त्यांना होती. पण,बाबासाहेबांना दुरदृष्टी होती.त्यांनी निजामाची चाल ओळखली आणि गनिमी कावा करत मकरणपुर(त्या काळात जि.जळगाव ) जी मराठवाड्याची बाँन्ड्री दि.30/3/1938 रोजी येथे ते
आले.जळगाव इंग्रजांच्या ताब्यात होते.त्या गावात मोठी परिषद निजाम विरोधात घेतली.त्यासाठी औरंगाबाद,जालना,नांदेड बीड जिल्ह्यातून मोठी गर्दी झाली होती.”अखंड भारत” या विषयावर प्रभावी भाषण झाले.त्यानंतर मग बाबासाहेबांनी औरंगाबादला अनेकदा प्रवास केला.1950 साली औरंगाबाद येथे मिलींद महाविद्यालयाची स्थापना केली.ज्या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भातून मुले. शिक्षणासाठी आले.त्या महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणारी सर्व मुले प्राचार्य,प्राध्यापक झाली , ज्यामध्ये राजाभाऊ धाट यांचा समावेश होता.मागास भागात त्यांनी शिक्षणाचे दालन सुरू केले यात त्यांची दुरदृष्टी आज लक्षात घेण्यासारखी आहे.देशाच्या स्वातंञ्य लढ्यात त्यांची भाषणे प्रभावी ठरली.कारण,देशासाठी स्पष्ट आणि परखड भुमीका घेणाऱ्यांपैकी ते आघाडीवर होते. नागरिकत्व कायदा असो किंवा जम्मू आणि काश्मीर 370 कलम यांना त्यांचा विरोध होता.खरे म्हणजे देशात दीर्घकाळ सत्तेवर असलेली काँग्रेस विचारांची माणसे त्यांच्या विचारावर गेली नाही.हेच भारताचे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.मात्र आज भारताचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे मात्र डॉ.आंबेडकर यांना अभिप्रेत असेच काम आज करीत आहेत.याचे मोठे समाधान भारतीय जनतेला आहे.
1941 साली ते कसबे तडवळे (जि.सोलापूर) येथे आले होते.हे गांव आज उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. त्या ठिकाणी पण,निजाम विरोधात परिषद घेतली. कारण,हे गांव मराठवाडा बॉन्ड्रीवर होते.लोकांनी त्या काळात बैलगाडीमधून भव्य मिरवणूक काढली जी गाडी एका माळी समाजाच्या शेतकऱ्याची होती.आठवण म्हणुन आज पण,ती गाडी जपून ठेवलेली आहे.दोन दिवस थांबून त्यांनी त्या गावात महार-मांग वतनदार परिषद घेतली.अखंड भारतासाठी निजामाच्या विरोधात जनमत तयार केले.ज्याची भिती निजामाला होती आणि नंतर तसेच झाले.डॉ. आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांची निरंकुश निजामी राजवटी बाबत जनजागृती केली.म्हणुनच मराठवाड्यात त्यांच्यावर बंदी घातली होती.? बाकी काही असले तरी या महामानवाचे मराठवाड्यात दोन ठिकाणी पाय लागले हे आपले भाग्यच म्हणावे लागेल.

अशा या महामानवाला अभिवादन…,
ञिवार प्रणाम…!

―राम कुलकर्णी (भाजपा प्रदेश प्रवक्ता,महाराष्ट्र राज्य.)

Back to top button