बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

#CoronaVirus पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे ऊसतोड कामगार स्वगृही परतणार

राज्य सरकार उद्या संध्याकाळपर्यंत ठोस निर्णय घेणार

मुंबई दि. १३:आठवडा विशेष टीम― ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्यासाठी गेल्या दोन-तीन आठवडयापासून सातत्याने प्रयत्न करणा-या पंकजाताई मुंडे यांच्यामुळे राज्यातील ऊसतोड कामगार आपापल्या घरी परतणार आहेत, राज्य सरकारकडून याबाबत उद्या संध्याकाळपर्यंत ठोस निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लाॅकडाऊन असल्यामुळे विविध ठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत, यातील बहुतांश कामगार हे बीड, अहमदनगर तसेच अन्य जिल्हयातील आहेत. हे सर्व कामगार एकत्र असल्याने त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे त्यांची तपासणी करून सर्वांना सुरक्षितपणे घरी पाठवावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी २८ मार्च, २, ६, ७ व ९ एप्रिल अशा तारखांना लेखी निवेदन, दूरध्वनी, ट्विट अशा माध्यमातून सातत्याने सरकारकडे केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी त्यांचे दूरध्वनीवर बोलणेही झाले होते. अखेर त्यांच्या या मागणीची दखल घेऊन सरकारने सर्व कामगारांना सुरक्षितपणे घराकडे पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

संयम बाळगा..सकारात्मक निर्णय नक्की होईल

पंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात ट्विट करताना म्हटले आहे की, समस्त ऊसतोड कामगारांचा जीव घरात गुंतलेला आहे, त्यांना आपापल्या घरी जाता यावं यासाठी गेले दोन तीन आठवडे झाले प्रयत्न करत आहे. मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, लवादाचे नेते जयंत पाटील आदी नेत्यांशी चर्चा केली होती, लवकरच यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. ऊसतोड कामगारां एवढीच मी देखील या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहे. आतापर्यंत आपण संयमाने राहिलात, पुढेही रहाल. केवळ ऊसतोड कामगारच नाही तर स्थलांतरित कामगारांच्या बाबतीत दिलासा देणारा निर्णय सरकार घेईल अशी अपेक्षा बाळगते.