अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

जिल्हा काँग्रेसचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ; 57 कार्यकर्त्यांचे रक्तदान

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवार, दिनांक 14 एप्रिल रोजी येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या ब्लड बँकेत तिस-या टप्प्यात आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात महिला,काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह 57 जणांनी रक्तदान केले अशी माहिती आयोजक बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळी दिली.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    सध्या अंबाजोगाईसह राज्यात लॉकडाऊनची परस्थिती आहे.तर दुसरीकडे रक्ताचाही तुटवडा ही मोठ्या प्रमाणात जाणवतोय.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार जिल्हा काँग्रेसने आज पुन्हा तिस-या वेळी मंगळवार, दिनांक 14 एप्रिल रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.प्रारंभी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी नगरसेवक मनोज लखेरा, महादेव आदमाने,सुनिल व्यवहारे,धम्मा सरवदे, सज्जन गाठाळ,राणा चव्हाण,महेबुब गवळी, भारत जोगदंड,जावेद गवळी,शेख मुख्तार,चेतन मोदी,माऊली वैद्य,रफिक गवळी,अजिम जरगर, सचिन जाधव,अमोल मिसाळ,महेश वेदपाठक, दयानंद गुजर,सुलतान गवळी,मतीन जरगर हे उपस्थित होते.तर या शिबिरात माजी नगरसेविका विजयश्री सज्जन जगताप, श्रीमती मोहर डाके,यासीन शेख या महिलांसह प्रवीण चोपने,शिवदास गुजर, सुनील बागल,विठ्ठल गवळी, महादेव ढगे,रवी राणेकर, शहाजी बरडे,खाजा गवळी, दशरथ यादव,विठ्ठल माळी, शिवराज ढगे,सतीश सातपुते,नितेश माळी, धनंजय बोर्डे,उमेश आडे अशोक आडे,शिवहर गुजर, गफ्फार गवळी,अकबर गवळी,विशाल सातपुते,रवी चव्हाण,कृष्णा पाटोळे, राजेश जोगदंड,बाबू जोगदंड,संतोष आंबेकर, दिलीप पवार,राहुल आडे, लहू गालफाडे,कमलाकर जोगदंड,यासीन शेख,एसके सोहेल मुस्तफा,एसके अबू एसके गफार,शेख अमीर, शेख रशीद,अनंत पवार, भारत जोगदंड,अजय वैद्य, सुलतान परसुवाले,ईश्वर घाडगे,रफिक गवळी,रोहित ताटे,मजहर सय्यद,सलीम बेलीवाले,सय्यद फैज,शेख इमरान,सय्यद जावेद इमरान,अजीम जरगर,शेख अब्राहम,मुदस्सर अन्वर, शेख अजीम,सय्यद इरफान, रमेश आडे,शेख अलीम, शेख अक्रम,प्रशांत शिंदे असे एकूण 57 जणांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिर प्रसंगी प्रभारी अधिकारी डॉ.विनय नाळपे हे उपस्थित होते.तर शिबिराच्या यशस्वितेसाठी सुजीत तुम्मोड,शशिकांत पारखे,तंत्रज्ञ सय्यद मुश्ताक,उबेद मिर्झा,शेख अन्वर,परिचर श्रीराम कुंजटवाड यांचे सहकार्य लाभले.रक्तदात्यांना वेळ ठरवून दिल्याने रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दी झाली नाही.आयोजकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत प्रत्येकांमध्ये किमान एक मीटर इतके सुरक्षित अंतर ठेवून सॅनिटायझर आणि मास्कची सुविधा उपलब्ध करून दिली.

    रक्तदान करून काँग्रेसचे महामानवाला अभिवादन -राजकिशोर मोदी

    विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जयंती दिनी 14 एप्रिल रोजी 57 जणांनी रक्तदान करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या ब्लड बँकेत
    रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.तसेच राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व महसूलमंञी तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांनी आपल्या सर्वांना काही दिवसांपूर्वीच आवाहन केले आहे.त्यामुळे बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज 3 एप्रिल,10 एप्रिल आणि 14 एप्रिल रोजी तिस-या टप्प्यात असे तीन वेळेस रक्तदान शिबिर आयोजित केले.त्यात महिला भगिनींसह 57 जणांनी रक्तदान केले.त्या सर्व रक्तदात्यांचे आभार.पुढील काळात रूग्णालयाच्या आवश्यकतेनुसार आणि टप्प्याटप्प्याने सुमारे 500 काँग्रेस कार्यकर्ते रक्तदान करतील अशी माहिती राजकिशोर मोदी यांनी यावेळी दिली.