कोरोना संकटात राष्ट्रवादीकडून सत्तेचा गैरवापर ; भाजपा प्रवक्त्यावर गुन्हे म्हणजे लोकशाहीची मुस्कटदाबी―राम कुलकर्णींचा आरोप

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
संपुर्ण देश आणि राज्य कोरोना संकटात सापडले असताना राज्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस कडून पोलिस यंत्रणेला हाताशी धरून भाजपा कार्यकर्ते आणि प्रवक्ते यांचे विरोधात सुडाचे राजकारण सध्या सुरू आहे.प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मालिका चालू करून राज्याच्या गृहमंत्र्यांनी लोकशाही आणि व्यकी स्वातंत्र्याची गळचेपी चालू केल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.

या संदर्भात भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांचे वतीने प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की,यश बँक घोटाळ्यात असणारे अरोपी वाधवान बंधुंना लॉकडावून काळात राज्याच्या गृह सचिवांनी परवानगी दिली.?या संदर्भात राज्याचे गृहमंत्री यांच्यावर प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी टिका करतांना सोशल माध्यमाद्वारे लेख प्रसिद्ध केला होता.मात्र राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून कुलकर्णी यांच्या विरोधात लातुर आणि कोंढाळी (जि.नागपूर) आदी ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरू केली आहे. एकिकडे सत्तेत मंत्री असणाऱ्या जितेन्द्र आव्हाडांच्या समोर ठाण्यात एका अनंत करमुसे नांवाच्या माणसांवर जिवघेणा हल्ला केला जातो.त्यांच्या तक्रारीची पोलिस दखल पण घेत नाही.मात्र खरी वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी वाधवान प्रकरणात त्यांनी गृह मंत्र्यांवर लेख लिहला.त्यात चुक काय.? वर्तमानकाळ मानवी संकटांचा आहे.कोरोना रुग्णांची प्रचंड वाढ होत आहे.अरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असताना सत्ताधारी मात्र सुडाचे राजकारण करत आहेत.व्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी केली जात आहे.ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्ती स्वातंञ्य,भाषा स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला दिला. त्या महामानवाची आज जयंती साजरी होताना राष्ट्रवादी पक्षाकडून आशा प्रकारचे गलिच्छ राजकारण केले जातेय हे मोठे दुर्देव असल्याचे या पत्रकात कुलकर्णी यांनी म्हटले आहे.