बीड जिल्हा

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीचा “ग्यान की लायब्ररी" उपक्रम ग्रामिण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त - माजी आ.पृथ्वीराज साठे

योगेश्वरी रोटरीच्या वतीने चिचखंडी व येल्डा येथील शाळेत पुस्तकांचे वाटप

अंबाजोगाई (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील विद्यार्थी हा स्पर्धेच्या युगात पुढे गेला पाहिजे. या उद्देशाने डोंगर पट्ट्यातील ऊसतोड मजुर व मोलमजुरी करणार्‍या कुटुंबातील चिचखंडी व येल्डा या दोन गावातील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीच्या वतीने पुस्तकांचे वाटप करण्यात आले.हा उपक्रम स्तुत्य व उपयुक्त असल्याचे प्रतिपादन माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी केले.

तालुक्यातील चिचखंडी येथील श्री.छत्रपती माध्यमिक विद्यालयात व येल्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीच्या वतीने विद्यार्थ्यांना “ग्यान की लायब्ररी" या उपक्रमाअंतर्गत पुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.पृथ्वीराज साठे हे होते.तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबासाहेब गडदे हे होते.तसेच चिचखंडी येथे शाळेचे मुख्याध्यापक देशमुख, संस्थेचे सचिव पारिख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शितोळे मॅडम यांनी करून उपस्थितांचे आभार पारिख यांनी मानले. चिचखंडी गावातील श्री.छत्रपती माध्यमिक विद्यालयात सुमारे 15 हजार रूपये किंमतीची विविध विषयांवरील सामान्यज्ञान वाढविणारे पुस्तके रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाईच्या वतीने देण्यात आली.
तसेच तालुक्यातील येल्डा या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही सुमारे 15 हजार रूपये किंमतीची विविध विषयांवरील सामान्यज्ञान वाढविणारी पुस्तके रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाईच्या वतीने देण्यात आली.या कार्यक्रमाला शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष तानाजी चामनर होते.

या शाळेचे शिक्षक विष्णु सरवदे यांनी सुत्रसंचालन केले तर शाळेचे मुख्याध्यापक वैरागे सर यांनी आभार मानले.दोन्ही कार्यक्रमाला माजी आ.पृथ्वीराज साठे, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीचे अध्यक्ष पांडुरंग पाखरे, सचिव सर्जेराव मोरे, माजी अध्यक्ष श्रीरंग चौधरी,सदाशिव सोनवणे,राजेंद्र रापतवार यांच्यासहीत रोटरीचे पदाधिकारी, शिक्षक,शिक्षीका आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.