बीड जिल्हाब्रेकिंग न्युजशेतीविषयक

लिंबागणेश येथे वाऱ्याने तार हालली आणि ज्वारीच्या कडब्याने पेट घेतला , जिवितहानी झाली नाही

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल अर्जुन माणिकराव यादव हे आपल्या शेतातील ज्वारीचा कडबा १००० कडबा घेऊन गावाकडे जात असताना दादा सुभाष घाडगे यांच्या घरासमोर कडब्याला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने ठीणगी पडुन कडब्याने आणि ट्रक्टरच्या टायरने पेट घेतला.यात ट्रालिचे एक संपुर्ण टायर जळुन खाक झाले.तसेच ट्रक्टरचे एक टायर सुद्धा जळाले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    जिवितहानी झाली नाही

    त्यानंतर विझवण्यासाठी दादा घाडगे,गणेश घाडगे,आशा घाडगे ,उषा यादव, कमलाकर जाधव यांनी पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नाही.या आगीत ट्रालीचे २००००रू ,ट्राक्टरच्या टायरचे एकुण ५५०००रू आणि कडब्याचे ३०००० रु असे एकूण लाख रुपयाचे नुकसान झाले