औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला कौटुंबिक टच ,सोयगावला शासकीय कार्यायातही अभिवादन

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीला यंदाच्या वर्षी कौटुंबिक टच मिळाला असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात घराघरात डॉ.बाबासाहेम आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.त्यामुळे कुटुंबात मात्र मोठा आनंद पसरल्याचे चित्र दिसून आले.सोयगाव तालुक्यात घराघरात आणि सोशल मिडीयावर जयंतीचा लाइव बघायला मिळाला.कोरोना संसर्गाचा संचारबंदी आणि गर्दीचा गोंधळ नको म्हणून यासाठी यंदाच्या जयंतीला हा निर्णय घेण्यात आला होता.
शहरातील शासकीय कार्यालयात जयंती सामाजिक अंतराचे भान ठेवत साजरी करण्यात आली.पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी शहरातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तहसील कार्यालयात तहसीलदार प्रवीण पांडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.पंचायत समिती,वनविभाग,कृषी कार्यालय,गटशिक्षणाधिकारी कार्यालय,आदी ठिकाणीही जयंती निमित्त सामाजिक अंतर ठेवत अभिवादन करण्यात आले.तहसील कार्यालयातील कार्यक्रमात नायब तहसीलदार मकसूद शेख,विठ्ठल जाधव,सुधीर जहागीरदार,अनिल पवार,संतोष नवगिरे,संभाजी बोरसे,शरद पाटील,आदींनी अभिवादन केले,यावेळी मकसूद शेख यांनी आभार मानले.

शासकीय यंत्रणांचे सामाजिक अंतर-

कोरोना संसर्गाचे सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून सोयगाव पोलीस ठाणे,तहसील कार्यालय,आदि ठिकाणी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला,ग्रामीण भागात मात्र घराघरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आल्याने यंदाच्या जयंतीला कौटुंबिक टच मिळाला होता त्यामुळे अख्खे कुटुंबाने एकत्र येत सामाजिक अंतर ठेवत घरातही जयंती साजरी केली.यामुळे मात्र कौटुंबिक सलोखा पहावयास मिळाला होता.