तलाठी, सरपंच यांना सोबत घेवून नियमानुसार गोरगरीब जनतेला रेशन वाटप―सौ.रेखाताई फड

बीड:आठवडा विशेष टीम―बीड विधानसभा मतदार संघातील माझ्या गावी घाटसावळी येथे आज दोन रेशन दुकानांना भेट देवून ‘बिपीएल’ धारकांनाीलळरश्रृवळीीरपलळपस ठेवून कुटूंबातील प्रत्येकी मोफत ५ किलो प्रति तांदुळ असे संपुर्ण गावकर्यांना स्वतःहा थांबून वाटप केले. यातून सरकारच्या या योजनेचा लाभ प्रत्येकाला लाभ मिळावा, कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये, याची विशेष दखल घेतली. आज पर्यंत गावकर्यांना संपूर्ण रेशन मिळाले नव्हते. त्यामूळे माझे गावकरी बांधव आनंदून गेले. येत्या दोन दिवसांत अंत्योदय अन्न योजना व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून गहू, तांदुळ सुद्धा जनतेला मिळणार आहे.कोणीही गरजु या योजनेपासून वंचित राहु नये,त्यासाठी ‘रेशन’ दुकानधारकाला तश्या कडक सुचना दिल्या आहेत. आणी कुटूंबातील लोकसंख्येनुसार प्रत्येकी व्यक्ती धरून पाच किलो तांदुळ दिल्याने एक-एकाच्या घरात २५ -३०४५ किलो रेशन गेल्याने, आता माझ्या गोरगरीब जनतेची उपासमार होणार नाही, याचे मला समाधान आहे.