#Lockdown बीड मध्ये पत्रकारावर अवैध दारू विक्रत्यांचा हल्ला

केज:आठवडा विशेष टीम― दि .१४ रोजी केज तालुक्यातील जिवाची वाडी येथे अवैध दारू विक्री बंद करण्याचा ग्रामपंचायत कार्यालय जिवाची वाडी यांनी ग्रामसभेत बहुमताने ठराव पास केला असुन पोलीस ठाणे , केज व विभागीय पोलीस कार्यालय केज यांना लेखी ठरावाची सत्य प्रत देऊन कळविलेने व सधा लॉक डाऊन असलेने चार ते पाच गावात सर्रास देशी विदेशी गावठी दारूउघड पणे विक्री होत असलेने येवता सर्कलचे पत्रकार आप्पाराव सारुक यांनी दि .७ रोजी दै. लोकमत मध्ये बातमी प्रसिद्ध केलेने पोलीस प्रशासनाने तिन फेऱ्या जिवाची वाडी तुकूचीवाडी व परिसरात केल्याने जिवाची वाडी येथील अवैध देशी दारू विक्रेता आसाराम जोतीराम चौरे व त्याचे मेव्हणे शिवाजी आसाराम सारुक व आबासाहेब आसाराम सारुक यांनी पाहणे एकत्र एऊन संगणमताने पत्रकार आप्पाराव सारुक यांच्यावर दि.१३ रोजी सायंकाळी ७ वा . हनुमान वस्ती’ येथे शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याने पोलीस ठाणे केज येथे दि.१३ रोजी रात्री उशीरा १०-३० वा. दरम्यान गुन्हा नोंद झाला असुन पुढील तपास पो. हे कॉ. बाळकृष्ण मुंडे यांच्याकडे दिला आहे .