सोयगाव: ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुकाभर बुधवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण आणि जमलेल्या ढगांच्या गर्दीने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असतांना अचानक वाऱ्याच्या दिशेने ढगांनी पळ काढल्याने सायंकाळी पुन्हा शेतकऱ्यांची निराशा झाली होती.परंतु ढगाळ वातावरणाने सोयगावला अंतिम टप्प्यातही मृगाच्या पावसाने हुलकावणी दिल्याचे पहावयास मिळाले.
सोयगावसह तालुका पावसाची प्रतीक्षा करत असतांना बुधवारी जमलेली ढगांची गर्दी आणि पसरलेला सुखद गारवा यामुळे मृगाच्या सरी कोसळण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या,परंतु सायंकाळी अचानक आलेल्या सुसाट वाऱ्याने काळीभोर जमलेली धग पळाल्याने शेतकऱ्यांच्या हातात निराशा आली होती.दिवसभर जमलेल्या ढगांच्या गर्दी पाहून शेतकऱ्यांनी व मजुरांनी शेती कामांची मोठी लगभग हाती घेतली होती…चौकट -उशीरा हाती आलेल्या माहिती नुसार सोयगाव तालुक्यातील घोसला. नांदगाव.सातगाव वडगाव कडे येथे साधारण पाऊस झाल्याचे वृत्त आहे
0