कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर तलाठी ,ग्रामसेवक ,वैद्यकीय अधिकारी ,कृषि सहाय्यक ,महावितरणचे कर्मचारी यांची संघटीत गुन्हेगारी जिल्हाधिकाऱ्यांनी मोडीत काढावी ―डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती घोषित केल्यानंतर मुख्यालयी राहण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बीड यांनी काढलेले असून आदेश पालन न करणारांवर भारतीय दंड संहिता १८६० (४५)यांच्या कलम १८८ शिक्षेस पात्र असलेला अपराध केला.असे मानन्यात येईल व ईतर कलमांसह दिवाणी व फौजदारी कारवाई करण्यात येईल असे लेखी आदेश काढून सूद्धा तलाठि , ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, प्रा.आ.केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी , महावितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसुन संबंधित दोंषिवर कारवाई जिल्हाधिकारी यानी करावे असे लेखी निवेदन डॉ.गणेश ढवळे यांनी दिले असून अशा प्रकारची संघटीत गुन्हेगारी जिल्हाधिकारी साहेबांनी मोडीत काढावी.
सविस्तर माहितीसाठी :- कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आल्यानंतर दि. २३/०३/२०२० रोजी मशाका / आपत्ती व्यवस्थापन/करावी / जिल्हाधिकारी कार्यालय, बीड करत.काक्ष / कोरोना विषाणु /२०२० /बीड रोजी आदेशानुसार बीड जिल्ह्यातील तलाठी व ग्रामसेवक यांना त्यांच्या मुख्यालयी राहण्यासाठी व सांधर्भिय क्रमांक ७,८चे तंतोतंत पालन करण्याचे आदेशित करत आहे.जिल्ह्यातील सर्व तलाठी , व ग्रामसेवक हे पोलिस पाटील व कोतवाल यांच्या मदतीने गाव पातळीवर उक्त आदेशाची अंमलबजावणी करतील,उपरोक्त आदेशाची अवज्ञा करणा-या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता १८६० ,(४५ ) यांच्या कलम १८८ शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानन्यात येईल व ईतर कलमांसह दिवाणी व फौजदारी कारवाई करण्यात येईल असे आदेश असताना सुद्धा तलाठी पगारे व ग्रामविकास अधिकारी तेलप पी.जे.हे मुक्कामी राहत नाहीत.आपण केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्याबाहेरील लोकांना लिंबगणेश ग्रामपंचायत हद्दीत आल्यानंतर ‘मी डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते’ या नात्याने त्यांना पकडून संबंधित ग्रामसेवक व तलाठी यांना फोनवरून कल्पना देऊनही तिन्ही वेळेस लिंबागणेश येथे हजर राहत नाहीत.त्यामुळे मूख्यालयी न राहणे व कोरोना राष्ट्रीय आपत्ती असताना कर्तव्यात कसूर करणे या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि अशाप्रकारच्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची संघटीत गुन्हेगारी मोडीत काढावी अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.