सोयगाव:केंद्र शासनाची पाच योजनेतून मिळणार ९ कोटीची तीन महिने मदत ,केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे यांची घोषणा

सोयगाव,ता.१५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाच्या टाळेबंद मध्ये नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून केंद्र शासनाच्या पाच योजनांमधून नऊ कोटींची तीन महिन्यासाठी विशेष मदत सोयगाव तालुक्याला देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा बुधवारी सोयगावला कोरोना उपाय योजनांच्या आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी केली.त्यांमुळे नागरिकांनी हताश होण्यासारखे मुळीच नाही कोरोनाला हरविण्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.अधिकाऱ्यांनी तीन मे पर्यंत मुख्यालयीच राहावे अशा स्पष्ट सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.
बैठकीत तहसीलदार प्रवीण पांडे यांनी खासदार रावसाहेब दानवे यांना कोरोना संसर्गाच्या उपाय योजनांचा आढावा सादर केला.यावेळी तालुक्यात मोफत धान्य वितरण योजनेचा आढावा तहसीलदार पांडे यांनी दिला.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे.वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकर कसबे यांनी गावनिहाय उपाय योजनांचा आढावा दिला.यावेळी उपविभायीय अधिकारी ब्रजेश पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,नगराध्यक्ष कैलास काळे,पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ आदींची उपस्थिती होती.कोरोना संसर्गाच्या टाळेबंद मध्ये नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी सोयगाव तालुक्यासाठी तीन महिन्यासाठी केंद्र शासनाकडून पाच योजनांमधून तीन महिन्यासाठी ९ कोटींचे पॅकेज केंद्राकडून उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.यामध्ये सन्मान योजना-३ कोटी ७२ लाख,पंतप्रधान गरीब कल्यान योजनेसाठी मोफत धान्य उपलब्ध,उज्ज्वल गॅस योजनेतून ८०७४ लाभार्थ्यांसाठी ६० लक्ष रु,जनधन योजनेतून १६५७० शेतकऱ्यांसाठी ७२ लक्ष रु आणि संजय गांधी योजनेतून १ कोटी २२ लक्ष इतकी रक्कम प्रत्येक महिन्याला खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे तीन महिन्यास्ठी ९ कोटींचे विशेष पॅकेज दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या सोयगावसाठी तयार करण्यात आलें सल्याचे केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले.यावेळी सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष इद्रीस मुलतानी,जेष्ठनेते सुरेश बनकर,तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे,विजय वानखेडे,सोयगावचे तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे,पंचायत समितीचे सदस्य संजीवन सोनवणे,जयप्रकाश चव्हाण,शिवाजी बुढाळ,मंगेश सोहनी,सुनील ठोंबरे,नगरसेवक योगेश मानकर,नायब तहसीलदार मकसूद शेख,पुरवठा अधिकारी नाना मोरे आदींची उपस्थिती होती.