कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणविशेष बातमीशेतीविषयक

#Coronavirus कोरोनाने किसानपुत्राचं भविष्यच लॉकडाऊन केलं,५ एकर टरबूज नांगरले, प्रशासनाने पंचनामे करून आर्थिक मदत करावी― डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे पोखरी येथिल प्रगतिशील किसानपुत्र ऋषिकेश बाबासाहेब खिल्लारे याने पारंपरिक पद्धतीने शेती सोडून ७एकर फळबाग लागवड म्हणून शेतात टरबुजाचे पिक घेतले, उत्पादनही भरपुर आले मात्र कोरोनामुळे बाजारपेठा बंद पडल्यामुळे त्याने कष्टाने पिकवलेल्या टरबुजात नांगर फिरवण्याची वेळ आली. शासनाने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  बीड तालुक्यातील मौजे पोखरी येथिल प्रगतिशील किसानपुत्र ऋषिकेश बाबासाहेब खिल्लारे याने ७ एकरमध्ये टरबुजाची लागवड केली.ठीबक ,मल्चिंग , औषध फवारणी, क्रॉप कव्हर , मजुरांचा पगार आदि.एकुण ७ लाख रू खर्च झाला.उत्पादनही मोठ्या प्रमाणात आले.मात्र कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाईत जिल्हा प्रशासनाने बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले.हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून घेतला.उभ्यापिकात नांगर फिरवण्याची वेळ आली.

  ऋषिकेश खिल्लारे:
  मी पाटोदा येथे पीव्हिपी महाविद्यालयात शिकत असुन आगळावेगळा उपक्रम म्हण़ून फळबागा लागवड करण्याचे ठरवले आणि ७ एकरमध्ये टरबुजाची लागवड केली. ठीबक बेड करणे, मल्चिंग , corp cover , आणि मजूरांचा पगार असे एकूण अंदाजे ७ लाख रू खर्च झाला.अपेक्षेप्रमाणे उत्पादन झाल्यामुळे १५-१७ लाख रु.होणे अपेक्षित होते.मात्र कोरोना विषाणु संबंधी कोव्हिड १९ मुळे बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने टरबुजावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.जिल्हा प्रशासनाने पंचनामा करून आर्थिक मदत करावी.

  सौ.यमुनाबाई खिल्लारे :

  मुलाने शिक्षण घेतघेत टरबुजाची लागवड केली, दररोजच्या २०-२५ बायका मजुर म्हणुन येत होत्या, परंतु कोरोनाने शेतक-यांचे कष्ट मातीत मिसळले, आता मजुर कामावर येत नाहीत ,घरच्याघरी आणि ४-५ बायका कामावर येतात , आज ३०० रु रोजाने सुद्धा मजुर कामावर यायला तयार नाही, मुलाने केलेले कष्ट मातीत मिसळलेलं बघून जीव तुटतो. मागील २ दिवसात ५ एकर टरबुजावर नांगर फिरवला, आता पुढं काय करायचं या काळजीत दिवस निघुन जातो,मात्र रात्री डोळ्याला डोळा लागत नाही, मूलानं केलेल्या कष्टाचं चीज झालं असतं मजी बरं वाटलं असतं.

  "किसान पुत्र ज्याप्रमाणे कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाईत जिल्हा प्रशासनासोबत आहे त्याचप्रमाणे कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाई जिंकल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या किसानपुत्रांच्या पाठीशी उभे राहुन कृषि अधिकारी, तलाठी यांच्याकडून पंचनामे करून आर्थिक मदत करावी . तसेच शेतकरी विरोधी कायदे १)सिलिंगचा कायदा २)अत्यावश्यक वस्तु ग्रहण कायदा ३) जमिन अधिग्रहण कायदा रद्द करण्यात यावेत तरच शेतक-यांच्या आत्महत्या थांबतील."

  ―डॉ.गणेश ढवळे: